Art, asked by siddhantsharma496, 4 months ago

-
१) मराठीचे लेखनविषयक नियम स्पष्ट करा.​

Answers

Answered by snehal9193
16

Answer:

नियम १ संपादन करा

अनुस्वार

नियम १.१ संपादन करा

स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.

उदाहरणार्थ: गुलकंद, चिंच, तंटा, आंबा

नियम १.२ संपादन करा

तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने पर-सवर्ण लिहिण्यास हरकत नाही.मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरावे.

उदाहरणार्थ: 'पंकज=पङ्कज', पञ्चानन, पंडित=पण्डित, अंतर्गत=अन्तर्गत, अंबुज=अम्बुज.

नियम १.३ संपादन करा

पर-सवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम शब्दांपुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंदू (अनुस्वार) देऊनच लिहावेत.

उदाहरणार्थ: 'दंगा, झांज, बंड, खंत, संप' हे शब्द 'दङ्गा, झाञ्ज, बण्ड, खन्त, सम्प' असे लिहू नयेत.

नियम १.४ संपादन करा

अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी पर-सवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते.

उदाहरणार्थ:

वेदांत=वेदांमध्ये, वेदान्त= तत्वज्ञान,

देहांत=शरीरांमध्ये, देहान्त= मृत्यू....

नियम १.५ संपादन करा

काही शब्दांमधील अनुस्वारांचा उच्चार अस्पष्ट असतो. कधीकधी तो उच्चारलादेखील जात नाही. अशा शब्दांवर अनुस्वार देऊ नये.

उदाहरणार्थ: 'हंसणे, धांवणे, जेव्हां, कोठें, कधीं, कांही' हे शब्द 'हसणे, धावणे, जेव्हा, कोठे, कधी, काही' असे लिहावेत.

#

नियम २: संपादन करा

अनुस्वार

नियम २.१ संपादन करा

य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा. 'ज्ञ' पूर्वीचा नासोच्चारही केवळ शीर्षबिंदूने दाखवावा.

उदाहरणार्थ: संयम, संरचना, संलग्न, संवाद, दंश, दंष्ट्रा, मांस, सिंह, संज्ञा' हे शब्द 'संय्यम, संव्रचना, संल्लग्न, संव्वाद, दंव्श, दंव्ष्ट्रा, मांव्स, सिंव्ह, संव्ज्ञा' असे लिहू नयेत.

नियम ३ संपादन करा

अनुस्वार

नियम ३.१ संपादन करा

नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.

उदाहरणार्थ: लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे.

नियम ३.२ संपादन करा

आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा अनुस्वार दिला पाहिजे.

उदाहरणार्थ: राज्यपालांचे, मुख्यमंत्र्यांचा, तुम्हांला, आपणांस, शिक्षकांना, अध्यक्षांचे.

नियम ४ संपादन करा

अनुस्वार वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी - व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे - अनुस्वार देऊ नयेत.

या नियमानुसार 'घंरे, पांच, करणें, काळीं, नांव, कां, कांच, जों, घरीं' हे शब्द 'घरे, पाच, करणे, काळी, नाव, का, जो, घरी' असे लिहावेत.

नियम५ संपादन करा

ऱ्हस्व-दीर्घ नियम

नियम५.१ संपादन करा

मराठीतील तत्सम इ-कारान्त आणि उ-कारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत.

उदाहरणार्थ : कवि=कवी, बुद्धि=बुद्धी, गति=गती.

इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार दीर्घ लिहावा.

उदाहरणार्थ: पाटी, जादू, पैलू

नियम५.२ संपादन करा

'परंतु, यथामति, तथापि', ही तत्सम अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत.

नियम ५.३ संपादन करा

व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे ऱ्हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त लिहावेत.

उदाहरणार्थ: हरी, मनुस्मृती, वर्गीकरण, पद्धती, कुलगुरू.

नियम ५.४ संपादन करा

'आणि' व 'नि' ही मराठीतील दोन अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत.

नियम ५.५ संपादन करा

सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद (पहिला शब्द) तत्सम ऱ्हस्वान्त असेल (म्हणजेच मुळात संस्कृतमध्ये ऱ्हस्वान्त असेल) तर ते पूर्वपद ऱ्हस्वान्तच लिहावे. दीर्घान्त असेल तर दीर्घान्तच लिहावे.

उदाहरणार्थ: बुद्धि -बुद्धिवैभव, लक्ष्मी -लक्ष्मीपुत्र.

साधित शब्दांनाही हाच नियम लावावा.

उदाहरणार्थ: बुद्धि-बुद्धिमान, लक्ष्मी-लक्ष्मीसहित.

नियम ५.६ संपादन करा

'विद्यार्थिन्, गुणिन्, प्राणिन्, पक्षिन्' या सारखे इन्-अन्त शब्द मराठीत येतात तेव्हा त्यांच्या शेवटी असलेल्या न् चा लोप होतो व उपान्त्य ऱ्हस्व अक्षर दीर्घ होते. परंतु हे शब्द समासात पूर्वपदी आले असता (म्हणजेच समासातील पहिला शब्द असता) ते ऱ्हस्वान्तच लिहावेत.

उदाहरणार्थ

विद्यार्थिमंडळ , गुणिजन, प्राणिसंग्रह, स्वामिभक्ती, पक्षिमित्र, योगिराज.

नियम ६ संपादन करा

ऱ्हस्व-दीर्घ नियम

मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपान्त्य (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा) इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहावा.

उदाहरणार्थ किडा, विळी, पिसू, इथे, निघो, फुगा, खुनी, सुरू, कुठे, उठो.

मात्र तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. तत्सम शब्दातील उपान्त्य इकार किंवा उकार मुळाप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहावेत.

उदाहरणार्थ: पूजा, गीता, अनुज्ञा, दक्षिणा

नियम ७ संपादन करा

ऱ्हस्व-दीर्घ नियम

नियम ७.१ संपादन करा

मराठी अ-कारान्त शब्दाचे उपान्त्य इकार व उकार दीर्घ लिहावेत.

उदाहरणार्थ: कठीण, नीट, रतीब, विहीर, ऊस, चिरूट, तूप, मूल.

तत्सम(मुळात संस्कृत असलेल्या) अ-कारान्त शब्दांतील उपान्त्य इकार व उकार मुळ प्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहावेत.

उदाहरणार्थ: गणित, विष, गुण, मधुर, दीप, न्यायाधीश, रूप, व्यूह

नियम ७.२ संपादन करा

मराठी शब्दांतील अनुस्वार,विसर्ग,किंवा

Answered by 9579511515
1

Answer:

Lalit saahityaache vivid parkar liha

Similar questions