India Languages, asked by shivammtadiyal, 3 months ago

मराठी में सोने के अंडे देने वाली मुर्गी की कहानी बताओ​

Attachments:

Answers

Answered by bhagyashripawar132
17

Answer:

एक शेतकरी एके दिवशी बाजारातून एक कोंबडी विकत घेतो... व विचार करतो की, मी या कोंबडीने दिलेले अंडे बाजारात विकेल... दुसर्‍या दिवशी सकाळी शेतकरी बघतो की, कोंबडीने सोन्याचे अंडे दिले आहे... शेतकरी खूप खूप खुश होतो.. तो त्याच्या बायकोला सांगतो... आणि बाजारात जाऊन ते अंड विकून येतो... त्याला भरपूर पैसे मिळतात... घरी येतांना तो बायकोला छान साडी व स्वतःला कपडे देखील आणतो.... त्या रात्री तो आनंदाने झोपतो... दुसर्‍या दिवशी बघतो, तर कोंबडी परत एक सोन्याचे अंडे देते.... आता तर शेतकर्‍याचा व त्याच्या पत्नीचा आनंद गगनात मावत नव्हता.... ते विचार करतात ही कोंबडी सोन्याचे अंडे कसे देत असेल... कदाचित या कोंबडीच्या पोटात अजून खूप सोन्याचे अंडे आहेत... या लोभापायी तो पत्नीच्या मदतीने कोंबडीचे पोट कापतो.. बघतो तर पोटात काहीही नसते शिवाय सगळीकडे रक्त पसरते.. स्वतःचे हात देखील रक्ताने भरलेले असतात... शेतकरी खूप खूप दुःखी होतो... खूप पश्चाताप करतो... मात्र वेळ निघून गेलेली असते....

तात्पर्य : अति तेथे माती..

Hope it will help you...

mark me as brainliest....

Similar questions