मराठी मध्ये प्रम ह्य शब्दावर निबंध लिहा
Answers
Answer:
आपले हृदय खूप जपून ठेवा, . ते खूप नाजूक असते. काही छोट्या छोट्या गोष्टी आणि घटनांचे त्यावर गंभीर प्रभाव पडतात. किंमती रत्नांना एकमेकांशी जोडून ठेवण्यासाठी देखील सोन्या चांदीचे कोंदण बनवावे लागते. त्याप्रकारे ज्ञान आणि विवेकाच्या कोंदणामुळे आपले हृदय दिव्यत्वाशी जोडलेले राहू शकते. मन आणि हृदय साफ आणि निरोगी ठेवण्यासाठी दिव्यत्वाशिवाय दुसरे उत्तम काहीही नाही. मग व्यतीत होणारा काळ आणि घटना यांचा त्यांना ना स्पर्श होऊ शकेल, ना ते जखमा करू शकतील.
एखादी व्यक्ती जेंव्हा अतिशय प्रेम व्यक्त करत असते तेंव्हा काय प्रतिक्रिया द्यावी किंवा त्यांचे आभार कसे मानावे हे आपल्याला समजत नाही. खरे खुरे प्रेम मिळवण्याची क्षमता प्रेम दिल्याने, प्रेम वाटल्याने प्राप्त होते. जेवढे तुम्ही केंद्रित होत जाल तेवढे तुम्हाला तुमच्या अनुभवांच्या आधारावर हे ज्ञात होत जाईल कि प्रेम निव्वळ भावनाच नाही तर प्रेम तुमचे शाश्वत अस्तित्व आहे.
Explanation:
please follow me
I will follow back you
Answer:
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !
मराठीतून इश्श म्हणून
प्रेम करता येतं;
उर्दुमधे इश्क म्हणून
प्रेम करता येत;
व्याकरणात चुकलात तरी
प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे शिकलात तरी
प्रेम करता येतं !
सोळा वर्ष सरली की
अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे
झोपाळे झुलू लगतात !
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !
प्रेमबीम झूट असतं
म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं
मानणारी माणसं भेटतात !
असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला
फिरायला नेलं नाही;
पाच मुलं झाली तरी
प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का?
प्रेमाशिवाय अडलं का?”
त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !”
तिच्यासोबत पावसात
कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं
खाल्लं असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी
तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने
तिच्या कुशीत शिरला असाल !
प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
Explanation:
Thank you ☺️❤️