मराठी निबंध भारत माझा देश
Answers
Answer:
भारत हा माझा देश आहे. भारत देश हा प्राणी, पशूपक्षी, निसर्ग, भाषा, धर्म, चालीरीती या सगळ्या बाबतीत विविधतेने नटलेला आहे. भारत हा एक कृषी प्रधान देश आहे. 80% लोक येथे शेती करतात. भारताच्या उत्तरेला उंच असा हिमालय पर्वत रांग आहे तसेच दक्षिणेला लांबच लांब समुद्र आहे. भारतात अनेक जाती, धर्माचे लोक एकत्र आनंदाने राहतात. एकमेकांबरोबर त्यांचे सण साजरे करतात. माझा देशासाठी अनेक वीरांनी बलीदान दिले. माझ्या देशात अनेक खेळाडू, कलावंत, शास्त्रज्ञ, होऊन गेले आणि आहेत. त्यांनी भारताचे नाव उंचावले आहे. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे. तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे. भारत देशात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आहे. माझा देश हा थोर आणि पुण्यवान माणसांचा देश आहे. माझ्या देशाने विज्ञानात खुप प्रगती केली आहे. असा हा विविध कला गुणांनी सजलेला माझा भारत देश आहे याचा मला खुप अभिमान आहे ,आणि तो मला खुप आवडतो. `