मराठी निबंध गोधडीची आत्मकथा
Answers
● गोधडीची आत्मकथा -
नमस्कार, मी गोधडी बोलतेय, एक फाटलेली टाकून दिलेली गोधडी. आज मी तुम्हाला माझी आत्मकथा सांगणार आहे.
माझ्या शरीरावर(कापडावर) सुंदर देखणं अस नक्षीकाम आहे. माझा जन्म तसा मुळी झालाच नाही, एका आजीबाईने ओट्यावर बसून टाके घातलेले मला. आजीबाईचा काम तस मस्तच होत. दर पावसाळ्यात एक गोधडी शिवायची. हाच माझा परिवार.
नदीला पाणी आलं की मला धुवत असत. नदीला पूर आला की त्या लाटेवर हुंदके घेताना मजा ती वेगळीच. थोडीशी जखम झाली (गोधडी फाटली) की आजी पुन्हा तिच्या कामाला लागायची, सुई दीर घेऊन मला ठिगळ लावायची.
पण आता माझी अवस्था खूप खराब झालीये. असंख्य जखमा आहेत म्हणून मला कोणी वापरत नाही. आता कुणाला थंडी वाजली की शेकोटीसाठी उपयोग होईल माझा.
चला जाते मी. निघायची वेळ झाली.
धन्यवाद...
Answer:
गोधडीची आत्मकथा मराठी निबंध
Explanation:
काल परवाच मी गावी आलेलो. मुंबईत असं काही थंडीचा लवलेश तसा नसायचाच. पण तरीही माझ्यासोबत एक गोधडी नेहमीच असायची. पुर्वापार चालत आलेली गोधडी माझी आवडीची होती. आज्जीने खास माझ्यासाठी एक नक्षीदार गोधडी बनवून लहानपणीच मला भेट म्हणून दिलेली, तेव्हापासूनच ती गोधडी माझ्या झोपेच कारण बनलेली. ती सोबत नसेल तर मला हवी तशी झोपही नाही लागायची. तिला उशीला घेतल कि स्वर्गसुखाची झोप अलगद मिळायची.
त्या रात्री मी माझ्यासोबत गावी आणलेली.. माझी आवडीची गोधडी अंगावर ओढून घेतलेली.. त्या गोधडीला जेमतेम चार-पाच अशीच भोकं पडलेली. तरीही त्या परीस्थितीतही ती माझं थंडीपासून रक्षण करत होती. मला जराही थंडी लागू देत नव्हती ती. मी गाढ झोपेत असताना कुणीतरी मला हाका मारताना दिसले. जेव्हा हाक यायची त्या मागून गोधडीसुध्दा हलायची. मला विचित्र वाटले मी डोळे उघडून पाहीले. तर पुन्हा आवाज आला…“अरे मी गोधडी बोलतेय,” असे वाक्य ऐकल्याबरोबर गोधडीला बाजुला केले. मग त्या गोधडीतून पुन्हा आवाज आला. बाळा, तुला माझी उब आवडते मला माहीत आहे. पण माझ्या अंगचे तुकडे तुकडे होताना तुला जराही दयामाया नाही का रे? माझ्या शरिरावर चार-पाच भोकं पडलेत… तुला एकदाही वाटत नाही कि ठिगळ लावून घ्याव असं. फक्त कामाला येतेय तसं वापरून घेत आहेस.. माझ्या जीवाचा जराही विचार नाही का रे तुला?
खूप खूप वर्षापुर्वी तुझ्या आज्जीने माझ्या शरीरावर(कापडावर) सुंदर देखणं अस नक्षीकाम केलेले. माझा जन्म तसा मुळी झालाच नाही, पण माझा जन्म घडवून आणला तो तुझ्या आजीबाईने ओट्यावर बसून टाके घातलेले मला. आजीबाईंचे काम तसे मस्तच होते. दर पावसाळ्यात एक गोधडी ती शिवायची. आणि हाच माझा परिवार व्हायचा.
नदीला पाणी आलं की मला नदीवर नेऊन मस्त धुवत काढत ती. नदीला पूर आला की त्या लाटेवर हुंदके घेताना मजा ती वेगळीच. थोडीशी जखम झाली (गोधडी फाटली) की आजी पुन्हा तिच्या कामाला लागायची, सुई दोरा घेऊन मला ठिगळ लावायची. पण तुझ्याकडे आल्यापासून माझी अवस्था खूपच खराब झालीये. माझ्या त्या जखमांकडे कुणाच काडीमात्र लक्ष नाही. जखमा आहेत म्हणून तुही मला नेहमी वापरत नाहीस. आता फक्त काही दिवस राहीलेत माझ्या आयुष्याचे मग कुणाला थंडी वाजली की शेकोटीसाठी उपयोग होईल माझा.
चल येते मी… तु घे लपेटून मला आणि झोपून जा.. आता माझ्या निघायची वेळ झाली. गोधडीचे बोलणे ऐकून मन भरून आले. मी दुसय्रा दिवशी स्वतः दोरा घेऊन माझ्या आवडत्या गोधडीच्या जखमा भरून काढल्या.
माझ्या आठवणींची सांधली गोधडी
चाललो पुन्हा घेऊन माझ्या घरी
जखम सांधले जिर्ण धाग्याने मी
हीच माझ्या आठवणींची गोधडी खरी
तर अशाप्रकारे आम्ही या लेखामध्ये तुम्हाला गोधडीचे आत्मवृत्त, गोधडीची आत्मकथा, मनोगत या विषयावर निबंध, भाषण दिलेले आहे. तुम्हाला जर हा निबंध, भाषण आवडले असेल तर कृपया कमेंट्स सेक्शन मध्ये तुमचं मत कळवा. धन्यवाद.