India Languages, asked by AnuragNishad123, 9 months ago

मराठी निबंध कष्टाचे महत्व​

Answers

Answered by saharasgjb
8

Answer:

आजचे युग हे विज्ञान संगणक युग मानले जाते. या संगणक युगात आपण सर्वजण वावरत आहोत. आज संगणक युगामुळे मानवाचे जीवन अगदी सुलभ झाले आहे. त्यामुळे मानव सगळी कामे यंत्राच्या साहाय्याने करू लागला आहे.

त्यामुळे काम करून घाम गाळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे शारीरिक श्रम करणाऱ्या श्रमिकांना आज यंत्र युगाच्या काळात निकृष्ट मानले जात आहे. असे करणे म्हणजे एक प्रकारे श्रमाचा आणि श्रमिकांचा अपमान आहे.

बौद्धिक कष्टा इतकेच शारीरिक कष्ट करणे सुद्धा महत्वाचे आहे. कष्ट केल्यानेच माणसाची प्रगती होते. तसेच जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी सुद्धा श्रम करणे महत्वाचे आहे.

श्रम म्हणजे काय –

श्रम म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती आपले ध्येय व स्वप्न पूर्ण करण्यासाठी शारीरिक किंवा बौद्धिक कष्ट करते व मेहनत करते त्याला एका अर्थाने काम करणे असे म्हटले जाते. श्रम करण्यामागे ध्येय मिळवण्याचा विचार असतो.

श्रमाचे प्रकार

कोणतीही व्यक्ती जे श्रम करते त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसे कि

शारीरिक श्रम

शारीरिक श्रम करणारा माणूस हा बांधकाम करणे म्हणजेच विटा उचलणे, सिमेंट लावणे किंवा मिसळणे इ काम करतो त्याला ‘शारीरिक श्रम’ असे म्हटले जाते.

बौद्धिक श्रम

शिक्षक जेव्हा शिकवण्याच आणि विद्यार्थी जेव्हा शिकण्याच काम करतात त्याला ‘बौद्धिक श्रम’ असे म्हटले जाते. हे दोघेही आपल्या बुद्धीला कष्ट देत असतात. कोणत्याही गोष्टीचा कसला तरी चिचार करणे याला सुद्धा आपण शरम म्हणू शकतो. कारण त्यामध्ये माणूस आपल्या बौद्धिक क्षमत वापरतो.

रोजगारी

काही व्यक्ती हे रोजगारीची सुद्धा कामे करतात. जेव्हा श्रम करण्यासाठी आर्थिक मोबदला दिला जातो त्या श्रमाला रोजगारी असे म्हटले जाते.

श्रमाचे महत्व

प्रत्येकाच्या जीवनामध्ये श्रमाला खूप महत्त्व आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी श्रम ही मुलभूत गोष्ट आहे. श्रम केल्याशिवाय जीवनात यश आणि यशाची कल्पना करू शकत नाही. मानवाने जर शारीरिक श्रम केलेत तर त्याला शरीर सौष्ठव लाभू शकते.

दररोज काम करणे हेच शारीरिक श्रम आहेत. श्रमिक जे काम करतात ते शारीरिक श्रम असतात कारण त्यांना जास्त शम करण्याची गरज भासत नाही. श्रमिक जे काम करतात त्यामुळे त्यांना जरुरीपेक्षा व्यायाम मिळतो.

अनेकदा त्यांना घटक सुद्धा ठरतो. पण बौद्धिक श्रम करणाऱ्या लोकांना लट्ठपणा, रक्तदाब, हृदयरोग इ. आजार होतात. म्हणून त्यांनी स्वतला वाचवण्यासाठी शारीरिक श्रम करणे गरजेचे आहे.

आळस माणसाचा शत्रू

असे म्हटले आहे कि, आळस माणसाचा मोठा शत्रू आहे. कारण जर हा कोणाच्या जीवनामध्ये लागला तर त्याचे जीवन नष्ट करून टाकतो. परंतु जी माणसे कष्टाळू आणि मेहनती असतात त्यांना कधी रिकामा वेळ मिळतच नाही.

ते नेहमी आपल्या कामामध्ये व्यस्त असतात. त्याउलट म्हणजे जी माणसे आळसी असतात ती स्वत: काम करत नाही आणि दुसऱ्यांना सुद्धा करायला देत नाहीत. म्हणून अशा माणसांपासून दूर राहणेच चांगले असते.

कष्टाची महती

समर्थ रामदास स्वामी यांनी कष्टाची माहिती सांगताना असे म्हटले आहे कि, कष्टाविना नाही फळ. आजच्या काळात घाम गाळणाऱ्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. परंतु कष्ट केल्यावरच आपल्याला फळ मिळू शकते.

निष्कर्ष:

माणसाला आपल्या जीवनात बौद्धिक श्रमा बरोबर थोडे फार शारीरिक श्रम करणे पण गरजेचे आहे. आपण सगळ्यांनी सुरुवातीच्या काळापासून श्रमांची सवय लावून घेतली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने आपण वचनबद्ध, ठाम आणि सुसंगत असले पाहिजे.

तसेच भारत देशात श्रमिक लोकांसाठी ‘कामगार दिवस’ साजरा केला जातो. या दिवशी आपल्याला जमेल ते काम करून श्रम आणि काम करणाऱ्या लोकांना आदर आणि सम्मान दिला पाहिजे.

Similar questions