मराठी निबंध
लॉकडाऊन काळाताल गणेशोत्सव
Answers
Answer:
कोरोनाच्या काळात यावर्षी राज्य शासनाच्या आणि विविध महापालिकांनी दिलेल्या सूचनांचं पालन करून घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायचा आहे. गणेशोत्सवासाठीच्या काही विशेष सूचना मुंबई आणि पुणे महापालिकेने दिल्या आहेत.
येत्या 22 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. घरगुती गणेश मूर्ती या बहुतेकदा आदल्या रात्री किंवा प्रतिष्ठापनेच्या दिवशी सकाळी घरी नेल्या जातात. पण यावर्षी कोव्हिड 19च्या साथीमुळे गर्दी टाळणे आवश्यक असल्याने गणेश मूर्ती चतुर्थीच्या 3 ते 4 दिवस आधीच नेण्याचं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे. याशिवाय गर्दी टाळून विसर्जन करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष नियम केले आहेत.
Explanation:
घरगुती गणपतीची ऊंची 2 फुटांपर्यंत आणि सार्वजनिक गणपतीची ऊंची 4 फुटांपर्यंतच असयाला हवी.
स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृत्रिम तलावातच गणपतीचं विसर्जन केलं जावं.
यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू किंवा संगमरवरी मुर्तीचेच पूजन करावं. हे शक्य नसेल आणि मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असेल तर तिचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावं. घरी विसर्जन अशक्य असेल तर कृत्रिम तलावातच विसर्जन करण्यात यावं.
गणपती
फोटो स्रोत,GETTY IMAGES
विसर्जनाची मिरवणूक न काढता आणि विसर्जनस्थळी कोणतीही आरती न घेता कमीत-कमी वेळात घरी पोहचावं.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी कोणते नियम?
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी केलेल्या नियमांचं मंडळांना पालन करणं बंधनकारक राहणार आहे.
कोरोनामुळे न्यायालय आणि स्थानिक प्रशासनाने मंडपांबाबत जे धोरण ठरवलं आहे, त्यानुसारच मंडप उभारले जावेत.
यंदा उत्सवाकरिता देणगी/वर्गणी स्वेच्छेने दिली तरच त्याचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनाने गर्दी आकर्षित होणार नाही हे पाहावं. तसंच, आरोग्यविषयक, सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी.
गणेशोत्सवासाठी आधी मंडळांनी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची परवानगी घ्यावी.
सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम म्हणजेच रक्तदान शिबिरं आयोजित करावी. तसंच कोरोना, मलेरिया, डेंग्यू अशा आजारांसाठी असलेल्या प्रतिबंधात्मक उपायांची जाहिरात करावी.
आरती, भजन, किर्तन आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. यावेळी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे आणि तरतुदींचे पालन करावे.
गणपती दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक यांमार्फत ऑनलाईन लोकांना उपलब्ध करून द्यावी.
गणपती मंडपाचं वारंवार निर्जंतुकीकरण करावं तसंच थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी. प्रत्यक्ष दर्शन घ्यायला येणाऱ्यांसाठी सोशल डिस्टन्सिंगचे, स्वच्छतेचे नियम पाळण्याची अट घालावी.
विसर्जनाची मिरवणूक न काढता आणि विसर्जनस्थळी कोणतीही आरती न घेता कमीत-कमी वेळात निघावं. विसर्जन स्थळ लवकरात लवकर रिकामं करावं.