मराठी निबंध माझे आजोबा
Answers
Answer:
माझे आजोबा हे कुटुंबातील सर्वात मोठे सदस्य आणि एक आदर्श आहेत. माझ्या आजोबांचे नाव प्रकाश असे आहे. त्यांचे वय ६० वर्ष आहे. माझे आजोबा हे एक सभ्य माणूस आहेत. तसेच ते सकाळी सगळ्यांच्या आधी उठतात. तसेच ते आपली रोजची कामे करायला सुरुवात करतात.
सगळे लोक त्यांचा खूप आदर करतात. तसेच घरातील प्रत्येक व्यक्ती त्यांचे ऐकतो. तसेच त्यांच्याकडून सल्ला सुद्धा घेतात. माझे आजोबा हे सरकारी शाळेत एक शिक्षक होते. कधी – कधी त्यांचे शिष्य हे त्यांना भेटण्यासाठी आमच्या घरी येतात.
तसेच माझे आजोबा मला शाळेत घेऊन जातात. शाळेत जाताना मी त्यांच्या नेहमी पाया पडतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. जेव्हा मी शाळेतून घरी येतो तेव्हा आम्ही दोघे मिळून जेवतो.
माझे आजोबा रात्री झोपताना मला सुंदर – सुंदर गोष्टी सांगतात. माझे आजोबा नेहमी गरज असलेल्या किंवा गरीब लोकांना नेहमी मदत करतात. मी रोज माझ्या आजोबांबरोबर बाजारात भाजी आणायला जातो