मराठी निबंध माझा आवडता मित्र
Answers
असं म्हणतात की जो वेळेला उपयोगी पडतो तोच खरा मित्र .कोणाशीही मैत्री करणे खूप सोपे आहे, परंतु चांगले मित्र असणे कठीण आहे. माझे बरेच मित्र आहेत परंतु मला राहुल सर्वात जास्त आवडतो .
राहुल माझा सर्वात चांगला मित्र आहे. तो माझ्या वर्गात आहे . तो पंधरा वर्षांचा आहे. तो माझ्या शेजारी राहतो, म्हणून आम्ही एकत्र खेळतो. तो मला खूप आवडतो. राहुल अतिशय सुंदर मुलगा आहे. त्याचे आरोग्य चांगले आहे. तो मधुर बोलतो. त्याच्याकडे चांगला शिष्टाचार आहे. तो अभ्यास आणि क्रीडा दोन्हीत पारंगत आहे. त्याने क्रीडा स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे जिंकली आहेत. जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा तो उपयुक्त ठरला.त्यांचे वडील डॉक्टर आहेत आणि त्यांची आई शिक्षक आहेत. दोघेही खूप दयाळू आणि सौम्य आहेत. त्याची आई मला तिच्या स्वतःच्या मुलासारखी वागवते . मला राहुल खूप आवडतो कारण तो बुद्धिमान व चांगला खेळाडू आहे. त्याच्याकडे कोणतीही वाईट सवयी नाही. तो त्याच्या पालकांचा , शिक्षकांचा आणि इतरांचाही आदर करतो . तो वेळेत शाळेत जातो आणि नियमितपणे घरगुती काम करतो. त्याच्या या वागणुकीमुळे तो शिक्षकांचाही आवडता विद्यार्थी आहे .
राहुलला गरीबांबद्दल खूप सहानभूती आहे आणि तो त्यांना मदत करतो . त्याला त्यांच्यासोबत देखील वेळ घालवायचा आहे.
Answer:
समीर हा माझा एक जिवलग मित्र आहे. तो नेहमी खेळांच्याच गप्पा मारत असतो. तो खरा खेळगडी आहे. समीरला कुठल्याही एका विशिष्ट खेळाची आवड आहे, असे नाही आहे. नाहीतर सदासर्वकाळ क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या मैदानाची लांबीरुंदी माहीत असते बरे? ई! सर्वच खेळांत तो रस घेतो. विशेष म्हणजे प्रत्येक खेळाविषयी त्याला तंत्रशुद्ध माहिती समीर खेळांविषयीची केवळ माहिती गोळा करत नाही, तर तो सर्व खेळ उत्तम खेळतो. सहज एखादा निरोप सांगायला म्हणून तो घरी येतो, आणि कॅरमचा एक डाव जिंकून जातो. तितक्याच सफाईने तो शाळेच्या क्रिकेट संघात आपली कामगिरी बजावतो. रात्रीच्या वेळी रस्त्यावर आट्यापाट्या खेळणाऱ्या कामगारांतही त्याला भाव आहे. 'समीरदादा' आले की आपला संघ जिंकणार, अशी त्यांना खात्री असते.
कोणत्याही खेळाच्या जागतिक स्पर्धा सुरू झाल्या की, त्याची सर्व माहिती, अगदी आकडेवारीसह समीरला तोंडपाठ ! किती राष्ट्रे या स्पर्धेत उतरली आहेत? सामने कोठे कोठे आहेत? प्रत्येक संघातील उत्तम खेळाडू कोण? त्या खेळाडूंच्या खेळाचे वैशिष्ट्य काय? यांबाबतची सगळी माहिती समीर देत असतो. त्याने बांधलेले अंतिम निकालाबद्दलचे आडाखे सहसा चुकत नाहीत; कारण याबाबतचा समीरचा अभ्यास चोख आहे. खेळांविषयीच्या पुस्तकांचा मोठा संग्रह त्याच्याजवळ आहे. प्रत्येक वृत्तपत्रात येणाऱ्या क्रीडाविषयक बातम्या तो बारकाईने वाचतो. आवश्यक ती कात्रणे काढून ठेवतो. त्याने जमवलेला खेळाडूंचा आल्बम तर पाहण्यासारखा आहे. कुठेही कोणी खेळाडू येणार आहे, असे कळले की समीर धावलाच तेथे त्याला भेटायला.
समीरच्या या छंदाला त्याचे आईवडील केव्हाही विरोध करत नाहीत. उलट दोघेही त्याचे कौतुक करतात. त्याचे बाबा क्रीडाविषयक मासिके त्याला आणून देतात. कारण समीर छंद सांभाळून आपला अभ्यासही उत्तम ठेवतो. त्यामुळे माझा हा दोस्त घरात, शाळेत आणि सर्व मित्रांत विशेष आवडता आहे.