CBSE BOARD X, asked by yakshalijoshi12, 7 months ago

मराठी निबंध ऑन यंत्र नसती तर​

Answers

Answered by sanjayshah25672
0

Answer:

यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Yantra Sampavar Geli Tar Marathi Nibandh

यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Yantra Sampavar Geli Tar Marathi Nibandh आज आपण पावलोपावली यंत्रांवर अवलंबून असतो. ही यंत्रे आता आपल्या नित्य व्यवहारात एवढी एकरूप झाली आहेत की ती यंत्रे आहेत व त्यांच्याविना आपले अडेल हे आपल्याला उमगतही नाही. कळले तरी वळत नाही. मग अनेकदा आपण त्या यंत्रांना अतिशय निष्काळजीपणे वागवतो. एकदा काय झाले, ही यंत्रे रागावली आणि त्यांनी आपली संघटना स्थापन केली. या संघटनेने संपाचा आदेश दिला. एका मध्यरात्री सारी यंत्रे संपावर गेली. मग जो गोंधळ उडाला तो काय वर्णावा!

सकाळी नेहमीप्रमाणे घड्याळाने आपला गजरच केला नाही. त्यामुळे सर्वांना जाग आली ती उन्हं वर आल्यावरच. धावत धावत आई नळाजवळ गेली; पण नळातून एक थेंबही पाणी येत नव्हते. घरातला फ्रीज बंद पडला होता. रेडिओ बोलत नव्हता. पंखा फिरत नव्हता. घराबाहेर आलो तर लिफ्टही चालत नव्हती. सगळेजण हवालदिल झाले. रोज सकाळी सकाळीच वृत्तपत्रे वाचायची सवय. सवय कसली, व्यसनच म्हणा ना! पण आज त्या वृत्तपत्रांचाही पत्ता नव्हता.

Similar questions