मराठी निबंध पुस्तकाची आत्मकथा
Answers
Answer:
Explanation:
ज्ञान शब्द कानावर पडताच आधी पुस्तकं आठवते कारण जास्त तर ज्ञान आपल्याला पुस्तकाच्या माध्यमातूनच मिळते. ज्ञानाने भरपूर, मनोरंजनाने छान आणि वेळेचेही ठेऊन मान असे हे पुस्तक आपल्या सर्वांकडे लहानपणापासूनच असते.
माझा जन्म एका लेखकाच्या हातून झाला आहे, माझ्या एका एका पानातून ज्ञानाचे भांडार वाहत असते.पुस्तक म्हटल की वेगवेगळ्या अंदाजात वेगवेगळे ज्ञान प्राप्त होणे जसे इतीहासिक, गोष्टी, मनोरंजन, शुर गाथा, चालू घडामोडी, ई.जेव्हा लेखकाने मला लिहिले तेव्हा मी खूप नवीन दिसायचो, ते नवीन कव्हर, साफ स्वच्छ पाने. त्यानंतर मी एका पुस्तकात काही दिवस पडून राहिलो आणि मग एक लहान मुलगा आला ज्याने मला विकत घेतले आणि त्याच्या घरी घेऊन गेला.त्याला जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा तो मला हातात घायचा आणि वाचायचा. जवळ जवळ तो अर्धा ते एक तास मला वाचायचा आणि मग जागच्या जागी व्यवस्थीत ठेवायचा.मला त्याने एक छानसे खाली रंगाचे कव्हर घातले होते ते जणू माझे कपडेच होते. मला तो सतत वाचत असल्यामुळे माझ्यावर धूळ बसणे कदाचितच होते. तो माझी खूप निगा राखायचा आणि माझ्यासाठी एक स्वतंत्र जागा केली होती तेथे मी रोज राहायचो.
नंतर मला त्याने त्याच्या एका मित्राकडे दिले मग तो माझी चांगली काळजी राखू लागला. तो मला रोज वाचू लागला आणि त्याने मला एक छानशी जागा केली होती तेथे तो मला नियमित ठेऊ लागला.
असे काही दिवस चालल्या नंतर त्याने देखील मला पूर्ण वाचून काढले मग पुन्हा मी एकटे पडले.त्यानंतर त्याने मला एका रद्दी वाल्याला विकले मग काय मी कधी ह्या कोण्यात तर कधी त्या कोन्यात, कधी पुस्तकांमध्ये दाबलेलो तर कधी पेपर मध्ये दाबलेलो असायचो. असे माझे खूप हाल झाले मग त्याने मला मध्यातून दोन तुकडे करून फाडले. मला खूप इजा झाल्या आणि खूप निराश ही वाटू लागले. मग त्याने माझे कव्हर फाडले जणू असे वाटत होते जसे कोणी माझे पंखच कापले आहेत. नंतर माझे एक एक पण मोकळे केले आणि मला विकून टाकले.माझे एक एक भाग वेगवेगळे झाले होते आणि मला एका वडापाव वाल्या दुकानदाराने विकत घेतले. तो माझ्या एक एक पानात वडापाव ठेऊन ग्राहकांना देत असे. ते गरम गरम वडापाव, त्यातील ते गरम तेल आणि चटणी वैगरे खूप इजा देत, खूप चटके बसत.तेव्हा मला माझे मागील एक एक क्षण आठवत होता की कसे माझे पहिले मालक मला नीट ठेवत, माझी काळजी घेत, मला नवीन कव्हर लावले, माझ्यासाठी एक स्वतंत्र जागा केली तेथे ते मला नियमित ठेवत असत. तसेच माझ्या दुसऱ्या मालकाचे देखील क्षण मला आठवत होते कारण त्यांनीही माझी खूप काळजी घेतली. परंतु शेवटी त्यांचे काम झाल्यावर मला रद्दीच्या भावात विकून मोकळे झाले ते बागितल्यवर मला खूप वाईट वाटले.
पुस्तक म्हणजे जणू ज्ञानाचे सागरच असते कारण त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते आणि खूप काही अनुभवायला मिळते.ज्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला एवढे ज्ञान मिळते, आपण लहानाचे मोठे होतात आणि त्याच पुस्तकाला आपण काम झाल्यानंतर फेकून देतात तर ते चुकीचे आहे. त्याची खरी जागा एका वाचनालयात आहे किंवा आपल्या घरात एक छोटेशे वाचनालय बनवा ज्यात तुमचे सर्व पुस्तक ठेवता येतील.