मराठी निबंध
पर्यावरणाचा त्रास, एक समस्या
Whoever will answer, I'll mark BRAINLIEST.
SPAM ANSWER will be REPORTED.
Answers
Answer:
अजून एक मुख्य मुद्दा म्हणजे मनुष्य सध्या पर्यावरणाच्या विरूद्ध जात आहे. जसे पर्यावरणाने मानवाला खाण्यासाठी खूप काही नैसर्गिक गोष्टी दिल्या आहेत जे फळांच्या रुपात आपल्याला मिळतात. परंतु मनुष्य मांसाहारी होऊन निसर्गातील जीवांना मारून त्यांचे मास खात आहेत. त्याच्या व्यतिरिक्त लोकं कृत्रिम पदार्थ खात आहेत जे एका निर्जीव स्वरूपात येतात. ह्या गोष्टींनी पर्यावरणाला, प्राण्यांना आणि मानवांना धोका निर्माण झाला आहे.
प्राण्यांची शिकार करून त्यांना मृत्यू देणे हे मनुष्याच्या हातात नाही आहे परंतु तरीही हे मनुष्याला समजत नाही. आजकाल तुम्ही ऐकलं असेल की काही प्राणी लुप्त होत आहेत आणि त्यांची पिढी देखील नष्ट झाली आहे तर त्या मानव मुळेच झाले आहे.
वाढती लोकसंख्या देखील पर्यावरणाला दूषित करते कारण जेवढी संख्या तेवढे जास्त प्रमाणात प्रदूषण होते. लोकं कुठे फिरायला गेले की लगेच कचरा करतात आणि प्लास्टिकचे वस्तू तर जागोजागी फेकलेली दिसतात ज्याने भूमी प्रदूषण निर्माण होते. नदी किनारी आणि समुद्र किनारी फिरायला गेल्यावर पर्यटक पाण्यात कचरा टाकतात आणि प्लास्टिकचे वस्तू, पिशव्या, बाटल्या अती फेकलेल्या असतात ज्याने जल प्रदूषण होते. तर हे रोखण्यासाठी आपण आपला कचरा आपल्या बॅगेत भरुन एका ठिकाणी कचरा कुंडीत टाकायला हवा ज्याने प्रदूषण नियंत्रित होईल.
पर्यावरण आपल्याला मिळालेली एक अमूल्य भेट आहे जी आपली काळजी घेते परंतु निराशाजनक बाब आहे की मनुष्य त्याची काळजी घेत नाही. त्यामुळे आजकाल प्रदूषण वाढून पर्यावरणाला हानी करत आहे ज्याने सर्व जीव सृष्टीला त्रास भोगावा लागत आहे.
पर्यावरण हा आपला एक मित्र आहे ज्याची काळजी आपण प्रदूषण मुक्त करून घ्यायला हवी. गाड्यांचा धूर आणि कारखान्यातील धूर व सांडपाणी नियंत्रित करून निसर्गाला सुरक्षित ठेऊ शकतो.
निसर्गाने पृथ्वीवर मनुष्याला सर्वात हुशार आणि बुद्धिमान जीव बनवला आहे परंतु तो त्या बुद्धीचा दुरुपयोग करू लागला आहे असते दिसत येत आहे तर जे प्रयोग पर्यावरणाच्या विरूद्ध आहेत ते रोखून जे प्रयोग पर्यावरणासाठी योग्य आहेत तेच करायला हवे.
Answer: