Hindi, asked by kritzz282, 1 year ago

मराठी निबंध वृक्ष माझा मित्र

Answers

Answered by saumya84
189
वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्रदूषणावर नियंत्रण आणि मुख्य म्हणजे ग्रामीण जनतेला सर्पण पुरवणे, इमारती लाकूड, औषधी उपयोग, असे अनेक उपकार आपली ही वृक्षराजी आपल्यावर करत असते . मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलातसुध्दा आपल्या  परिसरात अनेक प्रकारचे वृक्ष  आपल्या दृष्टीस पडतात. जेंव्हा ते नवीन पालवीने अथवा सुंदर फुलांनी बहरलेले असतात तेव्हा ते आपले लक्ष वेधून घेतात. वर्षानुवर्षे आपण त्याना बघत आहोत पण त्यांच नावगाव काय, ते आले कुठून, त्याचं वेगळेपण किंवा वैशिष्ठ्य काय, स्थानिक जैवविविधतेवर त्यांचा काही परिणाम असतो का, असे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. आपण जर त्याना मित्र समजतो तर त्यांची थोडी तरी माहिती असायला पाहिजे असं  नाही  वाटत तुम्हाला? मग चला तर सिटी-वॉकला. दर पत्रिकेत एकेका वृक्षाची ओळख करून घेऊया. मात्र त्यांच्याशी मैत्री वाढवण  सर्वस्वी तुमच्या  हातात आहे. ही  ओळख करून देत आहेत डॉ. विद्याधर ओगले. 

                                                               तामण 

शास्त्रीय नाव: Lagerstroemia speciosa 
सामान्य नांवे :  प्राईड ऑफ इंडिया, क्रेप मिर्तल, क्वीन्स फ्लोवर, मोठा बोंदारा 

भारत हे मूळ स्थान असलेला तामण महाराष्ट्राचे मानचिन्ह म्हणून स्वीकारला आहे. थोडक्यात, प्राईड ऑफ महाराष्ट्र झाला आहे. उष्ण व दमट हवामान आवडत असल्यामुळे बहुधा नदीनाल्यांच्या परिसरात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीत तसेच मुंबई, ठाणे, पुणे अशा शहरातून रस्त्यावर अथवा बागेत तामनीचे वृक्ष आढळतात. हिवाळ्यात पानगळ होऊन एकदा उन्हाळ्याच्या सुरवातीला व नंतर परत पावसाळ्याच्या मध्यावर झाड फुलांनी बहरून जात. फिकट किंवा गडद जांभळ्या रंगाच्या फुलांचा फुलोरा प्रत्येक फांदीच्या टोकाला बहरला कि कधीकधी त्या खालची मोठी पसरट  पाने दिसतही नाहीत. 5-7 सें.मि. व्यासाच्या फुलात 6 पाकळ्या असतात. मध्यभागी पिवळ्या पुकेसरांचा जुडगा फुलांच  सौंदर्य आणखीनच वाढवतो.पाकळ्या टोकाशी अश्या मुरडलेल्या असतात कि जणू काही क्रेपच्या कागदांची फुले असावीत. एकेक फुलोरा 30-45 सें.मि. इतका असतो. फलधारणा झाली कि फुल्लान्च्या जागी 3-4 सें.मि. आकाराची बोंडे धरतात.ही  बोंडे वाळल्यानंतर  बराच काळपर्यंत झाडावर रहात असल्यामुळे इतर वेळी तानानीचे झाड थोडे विद्रूप दिसते. पिकलेली बोंडे झाडावरच पाच कोनात  फुटून छोटे पंख असलेल्या बिया वार्याबरोबर दुरपर्यन्त जातात. तामनीच  आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे खोड पेरुसारखे राखाडी रंगाचे असून जुन्या सालीचे पातळ पापुद्रे वेगवेगळ्या आकारात गळून पडत असतात. तामनिच्या दुसरयां  एका जातीत फुलांचा रंग गुलाबी असतो. ही  तामणही अतिशय मोहक दिसते. तिचा उपयोग मुख्यत: बागेत लावण्यासाठी करतात. असा हा सुंदर तामण  ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञानी  व्हिक्टोरिया राणीला समर्पित केला आहे .  या झाडात corosolic acid हे द्रव्य असून त्याचा उपयोग रक्तातील साखर कमी करण्यासाठी होतो. याचे  शास्त्रीय नाव: Lagerstroemia हे मेग्नस फ़ोन लेगरस्ट्रोम या स्वीडिश निसर्गप्रेमीच्या सन्मारार्थ ठेवण्यात आले आहे.  
Answered by tanishqdivase
5

Answer:

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्रदूषणावर नियंत्रण आणि मुख्य म्हणजे ग्रामीण जनतेला सर्पण पुरवणे, इमारती लाकूड, औषधी उपयोग, असे अनेक उपकार आपली ही वृक्षराजी आपल्यावर करत असते . मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलातसुध्दा आपल्या  परिसरात अनेक प्रकारचे वृक्ष  आपल्या दृष्टीस पडतात. जेंव्हा ते नवीन पालवीने अथवा सुंदर फुलांनी बहरलेले असतात तेव्हा ते आपले लक्ष वेधून घेतात. वर्षानुवर्षे आपण त्याना बघत आहोत पण त्यांच नावगाव काय, ते आले कुठून, त्याचं वेगळेपण किंवा वैशिष्ठ्य काय, स्थानिक जैवविविधतेवर त्यांचा काही परिणाम असतो का, असे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. आपण जर त्याना मित्र समजतो तर त्यांची थोडी तरी माहिती असायला पाहिजे असं  नाही  वाटत तुम्हाला? मग चला तर सिटी-वॉकला. दर पत्रिकेत एकेका वृक्षाची ओळख करून घेऊया. मात्र त्यांच्याशी मैत्री वाढवण  सर्वस्वी तुमच्या  हातात आहे. ही  ओळख करून देत आहेत डॉ. विद्याधर ओगले.

Explanation:

pls mark as brainliest

Similar questions