Hindi, asked by dakharesunil, 10 months ago

मराठी प्रदूषण निबंध ​

Answers

Answered by payalaher29
9

Answer:

pls follow me

Explanation:

प्रदूषण म्हणजे काय

प्रदूषण म्‍हणजे घातक दूषित किंवा तत्‍सम पदार्थांचा पर्यावरणात होणारा निचरा. सामान्‍यत: प्रदूषण हा मानवी क्रिया-प्रक्रियांचा परिणाम आहे. अशी कोणतीही मानवी क्रिया जिचे परिणाम नकारात्‍मक ठरतात, तिला प्रदूषण म्‍हणतात.

प्रदूषणाचे स्त्रोत

गंभीर प्रदूषण स्‍त्रोतांमध्‍ये रासायनिक संयंत्रे, तेल शुद्धीकरण केंद्रे, आण्विक अवशेष किंवा कचर्‍याचे ढीग, नेहमीच तयार होणारा कचरा, भट्टीतील अवशेष, पीव्‍हीसी-, प्लास्टिक- तसेच गाड्यांचे कारखाने आणि मोठ्या प्रमाणात पशुमल निर्माण करणारी सामूहिक पशुकेंद्रे.

प्रदूषणाचे काही स्‍त्रोत, उदा. आण्विक उर्जा संयंत्रे किंवा तेलाच्‍या टाक्‍या ह्यांना अपघात घडल्‍यास फार गंभीर प्रदूषण निस:रित होऊ शकते.

आणखी काही सर्वसामान्‍य प्रकारच्‍या प्रदूषण स्‍त्रोतांमध्‍ये क्‍लोरिनेटेड हायड्रोकार्बन्‍स् (CFH), शिशासारखे अवजड घातू (उदा. लेड पेंट व आत्तापर्यंतचे पेट्रोल), कॅडमियम (रीचार्जेबल बॅटरीमधील), क्रोमियम, जस्‍त, आर्सेनिक आणि बेंझिन यांचा समावेश आहे.

प्रदूषण हा बहुतेक नैसर्गिक आपत्तींचा एक गंभीर दुष्‍परिणाम देखील आहे. उदाहरणार्थ जोराचे चक्रीवादळ झाल्यास सांडपाण्याचे प्रदूषण आणि उलटलेल्‍या नौका, वाहने किंवा किनारपट्टीय तेल-शुद्धीकरण प्रकल्पांपासून होणारे पेट्रोकेमिकल प्रदूषण होऊ शकते.

प्रदूषणाचे प्रकार

पारंपारिक प्रदूषणांच्‍या स्‍वरूपांमध्‍ये वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि किरणोत्‍सर्गी (रेडियोऍक्टिव्‍ह) दूषित पदार्थांचा समावेश आहे तर जहाजांपासून होणारे प्रदूषण, प्रकाशाचे तसेच ध्‍वनि प्रदूषण ही प्रदूषण ह्या शब्दाची विस्तृत व्याख्या आहे.

ध्वनि प्रदूषण

आरडाओरड म्‍हणजे नको असलेले आवाज. ध्‍वनि प्रदूषण हा हवा प्रदूषणाचा एक महत्त्वपूर्ण घटक असल्‍याचे आकलन आता जास्‍त चांगल्‍या प्रकारे झालेले आहे.

ध्‍वनि हा हवेच्‍या माध्‍यमाने प्रवास करतो आणि म्हणूनच ह्याचे मापन हवेच्या व्‍यापक गुणवत्ता पातळीमध्‍ये केले जाते. ध्‍वनिचे मापन डेसिबलमध्‍ये करतात. 90 डेसिबलपेक्षा जास्‍त जोराच्या आवाजामुळे बधिरत्‍व (बहिरेपण) येते किंवा शरीराच्‍या नाडीतंत्रात कायमस्वरूपी बदल होऊ शकतात असे तज्ञांचे म्‍हणणे आहे. वर्ल्‍ड हेल्‍थ ऑर्गनायझेशन (WHO) ने शहरासाठी ध्‍वनि स्‍तराचे सुरक्षित मापन 45 डेसिबल असल्‍याचे निश्चित केलेले आहे. भारतातील महानगरी क्षेत्रांमध्‍ये बहुतेक 90 डेसिबलपेक्षा जास्‍त ध्‍वनिपातळीची नोंद केली जात आहे; मुंबई हे जगातील तिसर्‍या क्रमांकाचे ध्‍वनिप्रदूषित शहर आहे, आणि अशाच प्रकारचे ध्‍वनिप्रदूषण स्‍तर दिल्‍लीचे ही आहे.

आवाज किंवा ध्‍वनिमुळे फक्‍त चि‍डचिड किंवा रागच येत नाही तर ह्यामुळे रक्‍तवाहिन्‍या संकुचित होतात, आणि ऍन्‍ड्रॅलिनचा प्रवाह वाढतो. ह्यामुळे ह्रदयाच्‍या कार्याची गति वाढते. सतत येत असलेल्‍या आवाजामुळे शरीरातील कोलेस्‍ट्रॉलची पातळी वाढते ज्‍यामुळे रक्‍तवाहिन्‍या कायमच्‍या संकुचित होऊन ह्रदयाघात आणि हार्ट स्‍ट्रोकचा धोका फार प्रमाणात वाढतो. प्रमाणापेक्षा जास्‍त ध्‍वनि किंवा आवाजामुळे न्‍यूरोसिस आणि नर्व्‍हस ब्रेक डाउनदेखील होतो असे तज्ञांचे मत आहे.

कचरा आणि जलप्रदूषण

जेव्‍हां विषारी पदार्थ तलाव, ओढा,नद्या, समुद्र आणि इतर जलाशयांमध्‍ये प्रवेश करतात तेव्‍हां ते पाण्‍यामध्‍ये विरघळून जातात किंवा तळाशी जाऊन कुजतात किंवा पाण्‍यावरच अवक्षेपित होतात. परिणामी जलप्रदूषण होते ज्‍यामुळे पाण्‍याच्‍या गुणवत्तेचा ह्रास होऊन जलपर्यावरण प्रणालींवर दुष्‍परिणाम होतो. प्रदू‍षक पदार्थ जमिनीखाली देखील जाऊन बसू शकतात आणि ह्यामुळे भूजल संग्रहांवर ही दुष्‍परिणाम होऊ शकतो.

जलप्रदूषण हे फक्‍त मानवांसाठीच नव्‍हे तर जनावरे, मासे आणि पक्ष्‍यांसाठीही विनाशकारी आहे.प्रदूषित पाणी हे पिण्‍यासाठी, त्यात खेळण्‍यासाठी,शेती आणि उद्योग ह्यासाठीदेखील अयोग्‍य आहे. ह्याच्‍यामुळे सरोवरे आणि नद्यांच्‍या सौंदर्यात्‍मक गुणवत्तेचा नाश होतो.

वायू प्रदूषण

वायू प्रदूषण म्‍हणजे हवेमध्‍ये घातक दूषित पदार्थांचे मिश्रण होणे. वायू प्रदूषणामुळे आरोग्‍य समस्‍या उद्भवू शकतात तसेच ह्यामुळे पर्यावरण व संपत्तीची हानी होऊ शकते. ह्याच्‍यामुळे वातावरणातील (पृथ्‍वीच्‍या सभोवताली असलेल्‍या वातावरणात) संरक्षक ओझोन थर पातळ होऊ लागला आहे (त्‍या थराचे घनत्‍व कमी झाले आहे) परिणामी हवामानात बदल घडून येत आहेत. उद्योग, वाहने, लोकसंख्‍येतील वाढ, आणि शहरीकरण हे वायू प्रदूषणास जबाबदार असणारे काही प्रमुख घटक आहेत. वायू प्रदूषण पुष्‍कळशा कारणांचा परिणाम आहे, सर्वच कारणे मानवी नियंत्रणाखाली नाहीत. वाळवंटातील धुळीची वादळे व जंगलातील आगीचा धूर तसेच गवतास लागणारी आग हे सर्व देखील वायू प्रदूषणाच्‍या रासायनिक व विशेष प्रदूषणात आपला वाटा उचलतात.

Answered by prasadalai2004
4

Answer:-

Read more on Brainly.in - https://brainly.in/question/13139853#readmore

Similar questions