India Languages, asked by SuPi3842, 1 year ago

मराठीत खडू आणि फळा संवाद लेखन

Answers

Answered by Hansika4871
64

संस्कार भारती विद्यालयात, इयत्ता आठवी मधील एका वर्गात, एके रात्री बाक, फळा, खडू या मध्ये गप्पा गोष्टी चालू असतात. हा संवाद खडू आणि फळ्यामधला आहे.(हा संवाद काल्पनिक असून, कुठच्याही खऱ्या गोष्टीवर आधारित नाही आहे, उत्तर वाच्णाऱ्याने ह्याचे भान राखावे)

खडू: आज आपल्या तिघांना एवढ्या महिन्यांनंतर वेळ मिळायला बोलायला.

फळा: हो ना रे!

खडू: मला शिक्षक तुझ्यावर लिहायला वापरतात.(हसत)

फळा: हो ना मला खूप मजा येते.

खडू: पण मी संपतो त्याचे काय ?

फळा: चालता रे, तुझे खूप भावंड आहेत(हसत)

खडू: फळ्या, तू पण खूप जुना झाला आहेस, तुझे शरीर मला लागते.

फळा: हो आता काय करणार, मला बदलायचा विचार चालू आहे शाळेत.

बाक: तुमचे भांडण बघायला मला खूप मजा येत आहे (हसत)

Answered by hasinaraut511
1

Answer:

खडू - सुप्रभात फळा दादा!

फळा - सुप्रभात खडू भाऊ! काय म्हणतोस? आज काही विशेष आहे काय?

खडू - ते का बरे?

फळा - अरे आज तुम्ही सर्व प्रकारचे सर्व रंगांचे खडू वर्गात एकाच वेळी असे कसे काय हजर झालात?

खडू - अच्छा ते का? अरे फळे दादा तू विसरलास का की आज काय आहे ते?

फळा - ( मनातल्या मनात आठवत स्वतःकडेच ) काय बरे विशेष असेल आज!

खडू - बघ म्हंटल होत ना तुला की आजचा दिवस तू विसरलास. आजपासून शाळा सुरु होत आहे ना. गेल्या वर्षभर कोरोनामुळे शाळेत न येऊ शकणारी मुले आजपासून शाळेत येणार आहेत. म्हणूनच तर फळ्यावर सुशोभना करण्यासाठी आम्हा सर्व विविध रंगांच्या खडुंची येथे रांग लागली आहे.

फळा - अरे हो भावा. मी असा कसा विसरलो की आजपासून माझे सगळे छोटे छोटे दोस्त पुन्हा शाळेत येऊन किलबिलाट करणार आहेत. त्यांची जंगी स्वागत तर झालेच पाहिजे. त्यांच्या शिवाय या शाळेला, मला म्हणजेच फळ्याला आणि तुला पण म्हणजेच खडूला काहीही महत्व नाही रे.

खडू - हो अगदी खरं आहे ते. म्हणूनच म्हणतोय चल कामाला लागू आणि गेला एक ते दीड वर्षे घरी बसून कंटाळलेल्या आपल्या छोट्या दोस्तांना त्याच्या शाळेच्या या पहिल्या दिवशी आनंदाचा सुखद धक्का देऊ.

फळा - नक्कीच चल मग लागूया कामाला.

खडू - हो चला रे सर्वांनी!

Explanation:

mark mi as a brainlist pllzz

Similar questions