World Languages, asked by aki86, 1 year ago

marathi batmi lekhan on swachhata Abhiyaan​

Answers

Answered by sachi1315
113

.......... Here's ur answer......

.. गांधी जयंतीचे औचित्य साधत शहरातील सर्व शाळांत गुरुवारी (२ ऑक्टोबर) स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

लालबहादूर शास्त्री आणि महात्मा गांधीजींची उद्या जयंती. त्यानिमित्त केंद्र शासनाने ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले आहेत. त्या अनुषंगाने शहरातील शासकीय कार्यालयांसह शाळांमध्येही ही मोहीम स्वयंस्फुर्तीने राबवण्याचे ठरवल्याचे, काही शाळांच्या मुख्याध्यापिकांनी सांगितले.

दिवसभर मिरवणूक, प्रभातफेरी, पथनाट्ये, स्पर्धा, असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. सर्व शाळांसह शहरातील विविध खासगी संस्थांच्या शाळांमध्ये व शासकीय शाळांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. यावेळी स्वच्छता शपथही दिली जाईल. भाग्यलक्ष्मी सरला गुरूसहाणी स्कूलद्वारे सकाळी आठ वाजता शाळेपासून कामगार चौकापर्यंत मिरवणूक निघेल. निसर्ग संवर्धनासाठी तीन पथनाट्ये होतील. जैन इंटरनॅशनल स्कूलतर्फे सकाळी सव्वा नऊ वाजता शहागंजमध्ये गांधी पुतळ्यास अभिवादन करून जनजागृती मिरवणूक निघेल. गांधी पुतळा ते निराला बाजार पर्यंत ही मिरवणूक असेल. सकाळी ११ वाजता मध्यवर्ती बस स्थानकात स्वच्छता अभियान राबवून दुपारी २ वाजता दौलताबाद किल्ला परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. शारदा मंदिर शाळेतही सकाळी स्वच्छता अभियान व स्पर्धा असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत........

.... Thnx..... ❤

Answered by kanthimathssk
10

Answer:

•○°●□■♤《》☆☆☆☆

✓✓✓✓✓✓

Explanation:

गांधी जयंतीचे औचित्य साधत शहरातील सर्व शाळांत गुरुवारी (२ ऑक्टोबर) स्वच्छता अभियानाचे आयोजन

करण्यात आले आहे.

लालबहादूर शास्त्री आणि महात्मा गांधीजींची उद्या जयंती. त्यानिमित्त केंद्र शासनाने 'स्वच्छ भारत अभियान' राबवण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले आहेत. त्या अनुषंगाने शहरातील शासकीय कार्यालयांसह शाळांमध्येही ही मोहीम स्वयंस्फुर्तीने राबवण्याचे ठरवल्याचे, काही शाळांच्या मुख्याध्यापिकांनी सांगितले.

दिवसभर मिरवणूक, प्रभातफेरी, पथनाट्ये, स्पर्धा, असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. सर्व शाळांसह शहरातील विविध खासगी संस्थांच्या शाळांमध्ये व शासकीय शाळांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. यावेळी स्वच्छता शपथही दिली जाईल. भाग्यलक्ष्मी सरला गुरूसहाणी स्कूलद्वारे सकाळी आठ वाजता शाळेपासून कामगार चौकापर्यंत मिरवणूक निघेल. निसर्ग संवर्धनासाठी तीन पथनाट्ये होतील. जैन इंटरनॅशनल स्कूलतर्फे सकाळी सव्वा नऊ वाजता शहागंजमध्ये गांधी पुतळ्यास अभिवादन करून जनजागृती मिरवणूक निघेल. गांधी पुतळा ते निराला बाजार पर्यंत ही मिरवणूक असेल. सकाळी ११ वाजता मध्यवर्ती बस स्थानकात स्वच्छता अभियान राबवून दुपारी २ वाजता दौलताबाद किल्ला परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. शारदा मंदिर शाळेतही सकाळी स्वच्छता अभियान व स्पर्धा असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

Similar questions