Marathi batyma lekhan 15 agust
Answers
Explanation:
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सोमवारी सरकारी इमारती, शाळा, महाविद्यालये तसेच खासगी गृहसंकुलांमध्येही स्वतंत्र भारताचा सन्मान करत ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्याची जाणीव मनात अधिकच अधोरेखित करणारा हा तिरंगा सूर्यास्तापर्यंत ठिकठिकाणी डौलाने फडकत होता. अनेकांच्या कपड्यांवर, गाड्यांच्या डॅशबोर्डवर, खिडक्यांच्या गजावरही तो दिमाखाने विराजमान झाला होता.
अनेक ठिकाणी सकाळपासून देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. येणाऱ्या पिढ्यांना स्वातंत्र्यासाठी आधीच्या पिढ्यांनी नेमकी काय किंमत मोजली याची जाणीव या निमित्ताने करून दिली गेली. काही ठिकाणी कार रॅली, बाईक रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. ‘भारतमाता की जय’ असे नारे देत झेंडे फडकवले जात होते. या निमित्ताने काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीची भावना चेतवणारी समूहगीते सादर केली.