Marathi don divas Appreciation in point wise
Answers
Explanation:
this is appreciation of marathi poem
Answer:
दोन दिवस कवितेचे रसग्रहण
कवितेचे नाव- दोन दिवस
कवी -नारायण सुर्वे
कवितेचा विषय- कवी नारायण सुर्वे यांनी काबाडकष्ट करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यातील संघर्ष त्यांना सतावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या जीवनातील भयानक वास्तव्य आपल्यासमोर प्रस्तुत केले आहे.
कवितेतून व्यक्त होणारा विचार- सतत येणाऱ्या समस्या, सतत येणारे दुःख आणि त्या दुःखातून पुन्हा उभे राहून येणार्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याचे धैर्य कष्टकऱ्यांच्या आयुष्यात असते.
कवी म्हणतो, दुनियेचा विचार हरघडी केला असा जगमय झालो दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो.
कष्टकरी कष्ट करत असले तरी ते नेहमी दुसऱ्यांचा विचार करतात कारण संपूर्ण जगच हे आपले आहे असे ते मानतात. दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक अशा समस्यांमुळे व दुःखामुळे त्या दुःखांना कसे सामोरे जावे हे ते शिकतात व पुन्हा भरारी घेण्यासाठी उभे राहतात. या दुःखाला सामोरे जाण्याची ताकद कशी मिळवावी हे ते अनुभवातून शिकतात. त्यांना कुठल्या शाळेत जाऊन शिकायची गरज नसते.
कविता आवडण्याची कारणे- कवीने खूप साध्या शब्दात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील दुःख व्यक्त केले आहे. कवितेतील प्रत्येक शब्द हा काळजाला भिडतो व जगण्याची प्रेरणा मिळते म्हणून ती कविता खूप आवडते.
कवितेतून मिळणारा संदेश- आयुष्यात कितीही चढ-उतार येत असले तरी सामर्थ्याने प्रत्येक समस्येला तोंड दिले पाहिजे, कारण सुख आणि दुःख हे आयुष्यातील अविभाज्य घटक आहेत.