Marathi eassy on maza avadta khel
Answers
लहानपणी माझा सर्वांत आवडता खेळ कोणता असेल? तर तो ‘खो-खो’. पाचवी पासून सातवी पर्यंत मला जेंव्हा कधी शाळेपासून सवड मिळायची, तेंव्हा मी गल्लीतल्या माझ्या सवंगड्यांसोबत ‘खो-खो’ खेळायचो. आम्ही मुले इतर खेळही खेळायचो, पण ‘खो-खो’ हा आमचा सर्वांत प्रिय असा खेळ होता.
ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. हा खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो व हा खेळ उत्कंठावर्धक होतो. हा खेळ १२ खेळाडू दोन संघात खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे ९ च् खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो.
१९५९-६० साली विजयवाडा येथे भारत सरकारने खो-खोची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली. भारत सरकारकडून खो-खोच्या प्रतिभावंत खेळाडुंना अर्जुन पुरस्कार व एकलव्य पुरस्कार पुरस्कार मिळतात.
■■माझा आवडता खेळ■■
माझा आवडता खेळ खो-खो आहे.मी हा खेळ माझ्या भाऊबहीण आणि मित्रांसोबत खेळतो. आम्हाला सर्वांना खो-खो हा खेळ खूप आवडतो.
खो-खो हा मैदानावर खेळला जाणारा एक खेळ आहे. या खेळामध्ये पैशांची गरज लागत नाही, कोणत्या गोष्टी खरेदी करण्याची आवश्यकता नाही. सगळे लोक हा खेळ खेळू शकतात.
खो-खोमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघात नऊ खेळाडू असतात.एका संघाचे खेळाडू खो-खोसाठी मैदानावर बसतात.
दुसर्या संघाचे खेळाडू त्यांच्याभोवती आणि त्यांच्यामध्ये धावतात.त्यांना जमिनीवर बसलेले खेळाडू पकडतात.जो खेळाडू पकडला जातो तो खेळाडू खेळातून बाद होतो.
खो-खोमुळे आपण वेगवान बनतो. आपला खूप व्यायाम होतो. यामुळे मित्रांसोबत खेळण्याचा आनंदसुद्धा मिळतो. या सर्व कारणांमुळे खो-खो हा माझा आवडता खेळ आहे.