India Languages, asked by mukkawarag24131, 10 months ago

Marathi Essay Aai Sampavar Geli Tar

Answers

Answered by shravanisable
6

Explanation:

एकदा डोळे बंद करून कल्पना करा की आई जर खरोखरच संपावर गेली तर, जर तिने घरचे काम करणे सोडले, जेवण बनवणे थांबवले, आणि जर तिचे प्रेम गोठले, तर काय होईल? जर आई संपावर गेली तर आपल्या आयुष्यात काय बदल होतील, ते सुखद असतील की दुःखद? सगळ्यात पहिली गोष्ट जी डोळ्यासमोर येते ती म्हणजे आईची कटकट थांबेल. हे आण, ते दे, इथूनच उठ, तिथे बस, हे घालू नको, वेळेत घरी ये, हे सगळे थांबेल. रात्री-बेरात्री मित्रांसोबत टवाळक्या करताना आईचा सारखा सारखा फोन येणार नाही; विचार करूनच किती मस्त वाटते. सकाळी ती उठवायला येणार नाही, ब्रश करायला लावणार नाही. आपण स्वताच स्वतःसाठी पाणी गरम करून वेळेवर आंघोळ करून नाश्ता बनवू. टिफिन भरू, दप्तरामध्ये सगळी वह्या-पुस्तके व्यवस्थित भरून स्वतःच वेळेमध्ये स्कूलबस साठी जाऊ. शाळेत शिक्षक-पालक मीटिंगसाठी बाबा वेळ काढून येतीलच, आईची गरज काय आहे. संध्याकाळी घरी आल्यावर आपली भांडी घासावी लागतील, दुसऱ्या दिवशीचे कपडे धुवून, इस्त्री करून घ्यावे लागतील. कपडे वॉशिंग मशीन मधून काढून सुकत घालावे लागतील, सुकून झाल्यावर ते घडी घालून ठेवावे लागतील. संध्याकाळची भूक लागल्यावर इडली, डोसा, थालीपीठाच्या जागी रोज झटपट होणारी मॅग्गी खावी लागणार. कधी सर्दी खोकला झाला तर स्वतःच्याच हाताने विक्स लावावे लागेल, स्वतः दवाखान्यात जावे लागेल. नेहमी लागणार्‍या गोळ्या, फर्स्ट एड किट, आयुर्वेदिक औषधे आणून ठेवावी लागतील. आणखी खूप काही आहे; हे तर आई करते त्याच्या ५% सुद्धा ही नाही. जर आई खरोखरच संपावर गेली आयुष्य थांबेल, कुठलेही काम वेळेत होणार नाही. आपल्याला आईविना जगण्याची सवयच नसते. तिच्या शिवाय आयुष्य कसे चालते हे आपल्याला माहितीच नसते. ज्या मुलांना आई नसते त्यांना विचारा आई नसणं काय असत. आई नसते तेव्हा बाबांना आई व्हावं लागत पण आयुष्यात कुठल्या ना कुठल्या रूपात आई असणं गरजेचं असतंच. आपण, आजकालची पिढी आईवडलांना, त्यांच्या प्रेमाला, काळजीला गृहीत धरतो; कधीकधी तर आपल्याला त्याचा त्रासही होतो. त्यांचा कधी कधी होणारा रागवा, चिडचिड आपल्या लक्षात राहते पण त्यामागची काळजी कळत नाही. आई खरोखरच संपावर गेली पाहिजे नाहीतर आपल्याला तिची किंमत कधीच करणार नाही.

Answered by halamadrid
8

◆◆आई संपावर गेली तर...!!!◆◆

मला कॉलेजला जाण्यासाठी रोज सकाळी लवकर आई उठवते.सकाळी उठल्यापासून ती कित्येक कामांसाठी माझी मदत करते.जर ती संपावर गेली तर, माझी खूप धांदल होईल.माझे सगळे काम मलाच करायला लागतील.

आईला मी माझ्या जीवनातील दररोज घडणाऱ्या सगळ्या गोष्टी,माझ्या मनातील गोष्टी सांगते,तेव्हा मला बरे वाटते.जर ती संपावर गेली तर, मी माझ्या मनातील गोष्टी कोणाला सांगणार?

आई माझ्यासाठी छान जेवण बनवते.माझे आवडीचे पदार्थ मला खाऊ घालते.जर ती संपावर गेली तर,माझ्यासाठी उत्तम जेवण कोण बनवणार. मग मला बाहेर जाऊन जेवायला लागेल.

आई माझे खूप लाड करते.माझ्या प्रत्येक गोष्टीकडे तिचे लक्ष असते.ती मला कोणत्याही गोष्टीची कमी होऊ देत नाही.अशा वेळी,ती संपावर गेली तर, माझे लाड कोण करणार?माझी काळजी कोण घेणार?

नको नको!!आई कधीच संपावर जाऊ नये.

know more:

1.https://brainly.in/question/4468912

आई संपावर गेले तर..... 

Essay in marathi

Similar questions