Marathi Essay Aarsa Nasta Tar
Answers
Answer:
आपण नीट दिसत आहोत ना,हे सुनिश्चित करण्यासाठी आपण रोज घरातून बाहेर निघताना स्वतःला आरशामध्ये पाहतो.रोज उपयोग केला जाणारा हा आरसा जर नसला,तर! तर मात्र लोकांचे फार हाल होतील.
आपण रोज स्वतःला आरशात पाहतो.आरसा आपल्याला आपला खरा रूप दाखवतो.आरसा नसला तर आपल्याला लोकांवर आणि मोबाइलच्या कॅमेरावर अवलंबून राहावे लागेल.
बाजारात गेल्यावर एखादी गोष्ट आपल्यावर कशी दिसते हे पाहण्यासाठी आपण आरशात बघतो आणि मग आपण ती वस्तू विकत घेतो.आरसा नसल्यामुळे आपल्याला हे करता येणार नाही.
कोणत्याही गाडीच्या बाजूला आरसा असतो,ज्यामधून मागून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज मिळतो.अशा वेळी आरसा नसल्यामुळे गाडी चालकाची फार गैरसोय होईल व अपघात होण्याची भीतिही वाढेल.
याचबरोबर आरशाचा उपयोग कॅमेरा,सौर ऊर्जा प्रकल्प,दुर्बिण ,दूरदर्शन आणि इतर वेगवेगळ्या औद्योगिक उपकरणांमध्येही केला जातो.डेंटिस्ट सुद्धा तोंडामधील सखोल भागात असलेली सडन शोधण्यसाठी आरश्याचा प्रयोग करतात.
अशा प्रकारे,आरसा हा खूप उपयोगी आहे.आणि जर आरसा नसला,तर मात्र लोकांना खूप समस्या होतील.
Read more on Brainly.in - https://brainly.in/question/4679439#readmore
◆◆"आरसा नसता तर"◆◆
आरसा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे उपयोगी ठरतो.रोज उपयोगी ठरणारा आरसा जर नसला तर,...!
तर, काय लोकांची खूप गड़बड़ होईल.
आरसा नसता तर, लोकांचे खूप हाल होतील. आपण प्रत्येकजण आरशाचा रोज उपयोग करतो.
आपण कसे दिसतो,हे आरसा आपल्याला दाखवतो.आरसा नसला तर, आपण कसे दिसत आहोत,हे आपल्याला लोकांना विचारावे लागेल.
आरशाचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांमध्ये केला जातो. सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये,कैमेरामध्ये,दुर्बिणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आरसा उपयोगी ठरतो.अशा वेळी,आरसा नसला तर, उपकरणे कसे बनवणार?
प्रत्येक गाडीच्या बाजूला एक आरसा लावलेला असतो.त्या आरशामधुन गाड़ी चालकाला मागून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज मिळतो.अशा वेळी,जर आरसा नसला तर अपघात होण्याची भीती आहे तसेच गाडी चालकाला फार समस्या होतील.
आरसा खूप महत्वपूर्ण आहे आणि जर तो नसला तर, लोकांना फार समस्या होतील.