Marathi Essay Bail Pola
Answers
◆◆बैल पोळा◆◆
बैल पोळा हा प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये शेतकरी द्वारा साजरा केला जाणारा बैलांचा सण आहे.हा सण श्रावण अमावस्येला साजरा केला जातो.
बैल शेतकऱ्यांची खूप मदत करत असतात.बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो.
या दिवशी बैलांना छान आंघोळ घातली जाते.नंतर त्यांना रंगवले जाते,छान सजवले जाते.त्यांना दागिने,फुलांच्या माळा घातल्या जातात.
त्यांचे नंतर पूजन केले जाते.मग त्यांना जेवण दिले जाते.नंतर संपूर्ण गावामध्ये नाचत गाजत बैलांची मिरवणूक काढली जाते.
या दिवशी बैलांना पूर्ण दिवस आराम दिले जाते.त्यांना पूर्ण दिवसासाठी कोणतेही काम करू दिले जात नाही.बैल पोळाच्या दिवशी घरी पुरणपोळी, करंजी व इतर गोड पदार्थ बनवले जातात.
बैल पोळाच्या दुसऱ्या दिवसापासून,शेताची नांगरणी केली जाते व बियांची पेरणी केली जाते.ज्यांच्याकडे बैल नाही आहेत,ते लोक मातीचे बैल बनवून त्यांची पूजा करतात.