India Languages, asked by janavidogra1948, 11 months ago

Marathi essay for 6th Standard

Answers

Answered by sv17
0

Marathi.TV

ESSAY IN MARATHI LANGUAGE

MY FRIEND ESSAY IN MARATHI LANGUAGE : MAZA MITRA NIBANDH, BEST FRIEND

friendship day marathi essay

My Best Friend Essay in Marathi

माझा मित्र निबंध :

“ये दोस्ती हम नाही छोडेगे| तोडेगे दम मगर तेरा साथ ना छोडेगे |” पूर्वीच्या सिनेमामध्ये दोस्तीवर खूप गाणे असायचे आणि गोष्टी पण दोस्तीवर आधारलेल्या असायच्या. त्यामुळे आम्हाला पण वाटायचे की आपली पण अशीच दोस्ती व्हावी कोणाबरोबर तरी.

तसे माझे खूप मित्र आहेत पण आम्ही लहानपणापासून एकत्रच होतो. त्यामुळे एक ग्रुप असा तयार झाला आहे. आम्ही सगळे एकटे किंवा एखादा भाऊ किंवा बहीण असलेले आहोत. आमची कॉलनी मध्ये सगळी न्यूक्लियर कुटुंबे आहेत. त्यामुळे आम्हाला एकत्र कुटुंबातील काहीच मजा माहीत नाही. आम्ही काहीतरी सनसनाटी घडावे अशी वाट बघत होतो. तेव्हड्यात त्याचे आमच्या शाळेत पदार्पण झाले. आम्हाला खुपच आनंद झाला .चला! आता ह्याची फिरकी घ्यायची. पण त्यानेच आमची तोंडे उघडीच राहतील असे पदार्पण केले.

मला अजून आठवतो आहे त्याचा आमच्या शाळेतील पहिला दिवस!कडक गणवेष, व्यवस्थित भांग पाडलेले केस नीट नेटके व्यवस्त्थित दफ्तर, पॉलिश केलेले बूट आणि ताठ बांधा. आम्ही सगळे जण त्याच्याकडे बघतच बसलो. शिक्षकांनी ओळख करून दिली, “हा अजिंक्य जोशी. आजपासून तो आपल्या शाळेत शिकणार आहे. हा कर्नल अमेय जोशींचा मुलगा आहे” आम्ही सगळेजण खूप खुश झालो.कारण अमेय जोशी आमच्या गावाचे भूषण आहेत. त्यांचा मुलगा आमच्या शाळेत खेळात पुढे जायचे म्हणून आला. शिक्षकांनी त्याला माझ्या जवळच बसायला सांगितले. आमची ओळख झाली आणि त्या दिवसापासून आम्ही दोघे जिवलग मित्र झालो.

Similar questions