India Languages, asked by DevanshGoel3807, 11 months ago

Marathi essay for junk food

Answers

Answered by khushichoudhary30
0

Explanation:

MARK AS BRAINLIEST and FOLLOW ME also please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please............

Attachments:
Answered by Hansika4871
0

*Essay on junk food*

आपल्या जीवनात आहाराचा शास्त्र आहे. प्राचीन काळापासून आहारावर लक्ष केंद्रित करत असताना त्यामध्ये कंदमुळं, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, प्रथिन, पिष्टमय पदार्थ, तंतुमय पदार्थ एकांतरित करण्यावर भर देऊन आहारावर लक्ष केंद्रित केले जात असे. परंतु बदलत्या काळानुसार लोकांनी आपल्या सवयी बदलून आहाराकडे दुर्लक्ष केले आहे.

लवकर शिजवता येणारे, बाजारात सहजासहजी प्रोजन अवस्थेत मिळणारे, तसेच बर्गर ,पिझ्झा ,फ्रेंच फ्राईज, अशा फास्ट फूडचे सेवन प्रकर्षाने होत आहेत.

अतिशय कमी दरात उपलब्ध होणारे, हे पदार्थ वेळेची बचत करतात आणि आपल्या जिभेचे चोचले देखील पुरवतात. चवीला रुचकर चविष्ट असणारे असे हे पदार्थ लोकांचे मन व हृदय जिंकतात म्हणूनच ते सर्वांना प्रिय आहेत.

शीतपेय, बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, नूडल्स, मैद्याचे विविध प्रकार, पावा चे विविध प्रकार, अजिनोमोटो असलेले पदार्थ, तेलकट तिखट तुपकट पदार्थ, कृत्रिम रंगा असलेले पदार्थ अथवा उदाहरणार्थ चायनीज तरुणाईला दिवसेंदिवस जास्तीत जास्त जवळ होत चालले आहेत. ही ह्याची उजवी बाजू असली तरी शारीरिक दृष्टि कणातुन त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत.

स्थूलपणा, गॅस, पोटाचे विकार, वाढते कॉलेस्ट्रॉल, हृदयाचे विकार, एसिदिटी वाढीस लागलेले आहेत. ह्या आहारामुळे निद्रानाशाच्या समस्या भेडसावत आहेत.

उत्तम चांगला आहार हा आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे, पण ती राखण्यासाठी अशाच जंग पुढचे सेवन टाळले आणि पौष्टीक आणि सकस आहाराचा आपल्या जेवणात समावेश केला तर येणाऱ्या पिढीला त्याचा निश्चित फायदा होईल.

Similar questions