India Languages, asked by rethramuthuraja, 3 months ago

marathi essay हुंडा डा एक Samasya​

Answers

Answered by BrainlyStud
0

Answer:

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi बघणार आहोत. हुंडा पद्धती म्हणजे समाजातील लोभिष्ट् स्वभावाच्या माणसाच्या वाईट मनोवृत्तीचा आरसा आहे. तसे तर हुंडाबळी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारा विषयीच्या बातम्या आपण वृत्तपत्र, टीव्ही व इंटरनेटच्या् माध्यमातून दररोज पाहतो.

या निबंधामध्ये आपण याविषयी चर्चात्मक व चिंतनात्मक स्वरूपाने विश्लेषण करणार आहोत. हुंडा प्रथेबद्दल समाजाची असणारी मानसिकता व हुंडाबळी कायद्यात असलेल्या कमतरता याविषयी सविस्तर वर्णन आपण करणार आहोत चला तर मग निबंध लेखनाला सुरुवात करुया. यामध्ये एकूण दोन निबंध देण्यात आहे रस्त्यात एका घरासमोर बरीच गर्दी दिसली. आणि या गर्दीचे वैशिष्ट्य म्हणजे या गर्दीत सर्व स्त्रियाच होत्या. कुतूहलाने मी जवळ गेलो. एका प्रशस्त बंगल्यासमोर त्या निदर्शने करीत होत्या. कोणावर अन्याय घडला होता याची चौकशी करता कळले की, त्या घरातील गृहलक्ष्मीनवागत सून ही हुंडाबळी ठरली होती. त्यासाठी 'नारी समता मंचा'च्या त्या स्त्रिया त्या कुटुंबातील लोभी माणसांची छीःथू करीत होत्या. मनात विचार आला की, या आलिशान बंगल्यातील मंडळींना अधिक धनाची इतकी हाव का सूटावी? मोठया थाटामाटात विवाह करून सासरी आणलेल्या आपल्या सूनेचा बळी त्यांनी धनासाठी का घ्यावा?आपल्या भारतात आर्थिक विषमता फार मोठ्या प्रमाणात आहे. एका बाजूला गडगंज संपत्ती असणारे भांडवलदार आहेत; तर दुसऱ्या बाजूला अन्नाची भ्रांत असणारे लक्षावधी गरीब आहेत. एका बाजूला उंच उंच आलिशान इमारती आहेत, तर दुसऱ्या बाजूला हीनदीन झोपडपट्ट्या आहेत. अशा या दोन परस्परविरोधी समाजांत एका बाबतीत मात्र साम्य आहे आणि ती बाब म्हणजे 'हुंडाबळी'.श्रीमंतांकडे ज्याप्रमाणे हुंड्यासाठी बळी पडतात, त्याप्रमाणे गरिबांच्यातही हुंड्यामुळे खून केले जातात. हुंड्याचे हे जहर आज पिढ्यान्पिढ्या आपल्या समाजात भिनले आहे. त्यामुळे मुलगी झाली की आईवडिलांच्या काळजाचा ठोका चुकतो. मुलीला जन्म देणाऱ्या स्त्रीकडे उपेक्षेने पाहिले जाते. कित्येक गरीब घरांतून तर या हुंड्याच्या रूढीपायी कित्येक मुली अविवाहित राहतात.आपल्याला असे वाटत होते की, जग जसे प्रगत होईल, शिक्षणाचा जसा प्रसार होईल तसा हा हुंड्याचा फास कमी होईल; पण आपली ही आशा फोल ठरलेली दिसत आहे. आज शहरांतून तरी शिक्षणाचा खूप प्रसार झाला आहे. मुली पदवीधर झाल्या आहेत. स्वतः नोकरी करून पैसे मिळवू लागल्या आहेत. तरी पण लोकांची हुंड्याची हाव काही सुटली नाही. उलट सध्या हुंडा वेगवेगळ्या स्वरूपांत समोर येतो. वरदक्षिणा, दागदागिने, मानपान, राहण्याची जागा, वाहन, टी व्ही., फ्रीज अशा विविध रूपांत हा हुंडारूपी भस्मासूर अवतरतो. जो ज्यांच्या अंगी संचारतो ते आपल्यातील माणूस हरवून बसतात आणि शेवटी त्यात नवपरिणित मुलीचा बळी घेतला जातो. या हुंडापद्धतीला आळा कसा घालायचा? वास्तविक १९६१ पासून आपल्याकडे हुंडाप्रतिबंधक कायदा लागू झाला आहे. पण हा कायदा अपुरा पडतो. त्यातून अनेक पळवाटा निघतात. हुंडा घेण्याचा गुन्हा करणाऱ्यांना त्या. फार सौम्य शासन आहे. म्हणून कायदयात सुधारणा करण्याचे खूप प्रयत्न चालू आहेत. पण येथे एक मोठा प्रश्न उभा राहतो की, या गोष्टी कायदयाने अमलात येतील का?

खरे म्हणजे त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधन आवश्यक आहे. समाजपरिवर्तन व्हायला हवे, पण हे कोण करणार? काही महिला संघटना आपल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. पण या प्रश्नातले एक कटू सत्य असे की, बहुसंख्य हुंडाबळी प्रकरणांमध्ये सासू, नणंद अशा स्त्रियाच कारणीभूत ठरलेल्या दिसतात. मग सांगा आता काय करावे?

Similar questions