Marathi essay Majha avadta Maitri
Answers
Answer:
अनुराग हा माझा आवडता आणि जिवलग मित्र आहे. आम्ही दोघे लहानपणापासून एकाच वर्गात शिकत होतो. तो एक आदर्श विद्यार्थी आहे. तो सर्वांशी अगदी चांगल्या प्रकारे आणि प्रेमाने बोलतो.
तो कधी कोणाशी भांडत नाही. जेव्हा आम्ही दोघे शाळेत जायचो तेव्हा संध्याकाळी मी त्यांच्या घरी जात असे. त्याची आई मला आपल्या मुलाप्रमाणे मानते आणि खूप प्रेम करते.
अनुराग सुद्धा माझ्या घरी येत असे. अनुरागला कोणी बहीण – भाऊ नाहीत. म्हणून त्याला माझे लहान भाऊ आवडतात.
आमच्या गावात एक छोटीशी नदी आहे. तिथे आम्ही दोघे दर रविवारी दुपारी नदीच्या काठावर फिरायला जातो. अनुरागला चित्रकला खूप आवडते. तो खूप सुंदर चित्रे काढतो.
जसा एक मित्र नेहमी आपल्या पाठीशी उभा राहतो. त्याच प्रमाणे अनुराग सुद्धा माझ्या प्रत्येक अडचणीत माझ्या पाठीशी राहतो. मी त्याच्यावर खूप प्रेम करतो.
आमच्या दोघांचं घर हे जवळ – जवळ आहे. म्हणून आम्ही लहानपणापासून चांगले मित्र आहोत. आम्ही दोघे आमच्या. सुरुवातीच्या शिक्षणाद्वारे जोडलेले आहोत.
एके दिवशी मला खूप ताप येत होता. मी आजारी आहे हे पाहून अनुराग रडू लागला आणि तो दोन दिवस शाळेत गेला नाही. आम्ही दोघे एकमेकांची खूप काळजी घेतो. त्यामुळे आमच्या दोघांची मैत्री ही आणखीनच मजबूत होते
Explanation:
....tanaya02.....