Marathi Essay Mazi Shala nibandh: मराठी निबंध माजी शाला निबंध
Answers
काय भुर्रकन गेले ते दिवस! शाळेचे! कळलंसुद्धा नाही!
कॉलेजात जायच्या आणि पुढे काहीतरी बनायच्या ध्येयापुढे आपल्या बालपणाच्या सोनेरी पानाला आपण अगदी सहज, उडत्या पांढर्या म्हातारीला तिच्या बीमधून काढून एकेक करून वार्यावर भिरकावून द्यावं तसं भूतकाळाच्या अंगणात नेमाने रतीब घालत टाकून आलो. आता ते बालपणाच सोनेरी पान दुरून फक्त पाहता येतं. परत मिळवता येत नाही, इतकंच कशाला, त्याला स्पर्शही करता येत नाही! मुकलो त्याला कायमचंच!
आज मेंदूला ताण देत वर्गातल्यांची नावे आठवावी लागतात. कोण कुठे बसायचं, कोण कस शिकवायचं हे इतरांकडून विचारून खात्री करून घ्यावी लागते!
एक मात्र नक्की, भूतकाळात रमताना शाळेच्या आठवणींसारखं दुसरं काहीच नसत. क्वचित बदललेली शाळा, बदललेले वर्ग, बदललेले बेंच, बदललेले शिक्षक, नवे जुने मित्र! काही जुनेच काही मागून आलेले. काही मध्येच शाळा सोडून गेलेले! शाळेची नवी-जुनी इमारत, शाळेच मैदान, तिथला झेंड्याचा कट्टा! असा फार मोठा आणि वैविध्यपूर्ण पसारा चुंबकाला चिकटलेल्या विविध लोखंडांच्या वस्तूंप्रमाणे झालेला असतो. एकेक क्षण त्या चुंबकापासून खेचून घेऊन नीट न्याहाळीत बसावे वाटते.
काय एकेक आठवणी
काढाव्या तेवढ्या कमीच!
खोल पाहत बसणं आणि
खुदकन हसणंही उगीच!
रोज त्याच चालीवर शिकवणारे
दोन-चार शिक्षक आठवतात
वर्गातल्यांची नावे आठवताना
एकेक चेहरे डोळ्यांपुढून सरकतात!
पहिल्या दिवसाची प्रार्थनेची रांग अन दिवस पहिला बेंचवरचा आठवतो वर्गशिक्षकांची हजेरी आणि मागचा
फळ्यावरचा सुविचार आताही वाचता येतो!
मोठेपणीच्या या लंचटाईमला
मधल्या सुट्टीतली भूक लागत नाही
डबे काढून बसा एकत्र सगळे
अस सांगणारी घंटा आता वाजत नाही!
तेव्हाचे गृहपाठाला कुरकुरणारे हात
आता लिहिण्यासाठी आसुसतात
वाटतं, धावत जाऊन शाळेला विचाराव
सोमवारी येऊ का शाळेच्या गणवेशात?
Answer: here's your answer
Explanation:
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये शाळेचे वेगळेच महत्त्व असते. कारण आपण जीवनामध्ये शाळेच्या कित्येक आठवणी घेऊन जगत असतो.
आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला घडवण्यात तीन गोष्टींचा मुख्य वाटा असतो. एक म्हणजे आई – बाबा, दुसर म्हणजे आपला परिसर आणि तिसरा आणि महत्वाचा हिस्सा म्हणजे आपली शाळा.
परंतु शाळेत गेल्यावर प्रत्येक मुलांना एक निबंध नेहमी लिहायला दिला जातो, तो म्हणजे माझी शाळा. मित्रांनो आज मी तुम्हाला माझी शाळा यावर निबंध सांगणार आहे.
माझी शाळा
Essay On My School in Hindiमाझी शाळा खूप सुंदर आहे. माझ्या शाळेचे नाव शारदा विद्यामंदिर असे आहे. माझी शाळा कोल्हापूर शहराच्या मध्यभागी स्थित आहे. माझी शाळा ३ मजली आहे. माझ्या शाळेमध्ये १ ली ते १० वी वर्ग आहेत. तसेच माझ्या शाळेच्या समोर एक फुलबाग आहे आणि खेळण्यासाठी मैदान आहे.
शाळेचा गणवेश
माझ्या शाळेचा एकच गणवेश ठरलेला आहे. सर्व शाळेतील मुले तोच गणवेश घालून शाळेत येतात. आमच्या शाळेत शिस्तेचे फार महत्त्व आहे. शाळेची पहिली घंटा होते तेव्हा सर्व मुले शाळेच्या फाटकाच्या आत येतात.
दुसरी घंटा होते तेव्हा सर्व मुले आपापल्या वर्गात जाऊन बसतात आणि तिसर्या घंटेला प्रार्थना सुरु होते. आमच्या शाळेच्या दिवसाची सुरुवात ही प्रार्थनेपासून होते.
आम्ही सगळ्या वर्गातील मुले रांगेने एका हॉलमध्ये जमतो. त्यानंतर जन – गण – मन हे राष्ट्रगीत गातो. तसेच ओंकार आणि गायत्री मंत्र म्हटला जातो.
वाचनालय
माझ्या शाळेत एक मोठे वाचनालय आहे. तिथे खूप शांतता असते. मी आणि माझे मित्र तिथे जाऊन आम्ही विविध पुस्तके वाचतो. वाचनालायामध्ये खूप पुस्तके असतात.
पण मला त्या सर्व पुस्तकांपैकी गोष्टींची पुस्तके वाचालायला खूप आवडतात. तसेच आम्ही लेबोरेटरी मध्ये विज्ञान विषयाचे विविध प्रयोग करायला जातो. त्यात मला खूप आनंद होतो.
शाळेतील शिक्षक
Essay On My School in Hindi
माझ्या शाळेतील सर्व शिक्षक खूप मनमिळाऊ आहेत. ते आम्हाला चांगल्या प्रकारे शिकवतात आणि कोणतीही गोष्ट खूप समजून सांगतात. त्याच बरोबर आम्हाला शिस्त पाळण्यास शिकवतात.
तसेच ते आम्हाला विविध प्रकारच्या खेळांमध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहन करतात. जेव्हा रविवारी शाळेला सुट्टी असते तेव्हा मला करमत नाही.
सहली
उन्हाळी सुट्टीत आम्हा सर्वांसाठी पोहण्याची विशेष शिबिरे आयोजित केली जातात. तसेच आमच्या लहान – मोठ्या सहली काढल्या जातात. मी दरवर्षी सहलीला जातो. सहलीला जाण्यात मला खूप आनंद होतो.
हिरवीगार बाग
माझ्या शाळेच्या समोर एक हिरवीगार बाग आहे. त्या बागेमध्ये विविध फुलांची झाडे आहेत. तसेच त्या झाडावर जेव्हा फुले लागतात तेव्हा ती बाग खूप सुंदर दिसते.
आम्ही सर्व दररोज या झाडांना पाणी घालतो आणि त्यांची काळजी घेतो. त्याच बरोबर हिरवेगार गवती मैदान सुद्धा आहे.
शाळा ही गुणांची खाण
माझी शाळा ही गुणांची खाण आहे. माझ्या शाळेमध्ये विविध धर्माच्या आणि जातीच्या मुलांना प्रवेश दिला जातो. माझ्या शाळेतील शिक्षक हे गावो – गावी फिरून ज्या कुटुंबाची परिस्थती आपल्या मुलांना शिकवण्यासाठी अवघड असते.
अशा मुलांना शाळेत प्रवेश देऊन त्यांना फुकट शिक्षण दिले जाते. त्यांच्या घरच्याच आयुष्य घडवितात. त्यापिकी काही मुले ही मोठी होऊन डॉक्टर, कलेक्टर आणि इंजिनियर झाली आहेत.
निष्कर्ष:
खरोखरच प्रत्येकाच्या जीवनात शाळेचे खूप महत्त्व असते आणि शाळा ही खूप मोठी भूमिका बजावते. मला माझ्या शाळेबद्दल खूप अभिमान आहे. मला असे वाटते कि, शाळा सोडून कधी गेलेच नाही पाहिजे. आम्हाला पण आमच्या शाळेचे नाव उज्जवल कराचे आहे. अशी आमची शाळा आहे आणि मला माझी शाळा खूप – खूप आवडते.