Marathi essay mi kridangn boltoy kalpanapradhan
Answers
Explanation:
मी क्रीडांगण बोलतोय.
मी शाळेतील ती जागा आहे, जी सगळ्या विद्यार्थ्यांना खूप जास्त आवडते.
बरोबर ओळखले!
मी क्रीडांगण बोलतोय.
तास तर मी मुलांनी गजबजलेला असतो, पण आज सुनसान आहे.
कसं काय?
परीक्षा चालू आहे ना तुमची? मग खेळायला गर्दी तशी कमीच असेल ना.
खरं सांगू? मला ना मुलं खूप आवडतात. ते माझ्यावर खेळतात, पडतात, काही राडतातही पण परत उठून उभे राहतात. जगण्याचं सार शिकवून जातात ही मुलं. कितीही धडपडले तरी उठून उभे राहतात. त्यांच्या चेहऱ्याचे तेज मला आनंद देते.
माझ्यावर अनेक स्पर्धा होतात. कब्बडी, खो खो, बॅडमिंटन, क्रिकेट आणि इतर अनेक खेळ माझ्यावर खेळले जातात. मुलांचे हसरे चेहरे पाहिले की माझे मन प्रसन्न होते. माझ्यावर खेळून पुढे गेलेले खेळाडू दिसले की उर अभिमानाने भरून येतो.
पण आता सुट्टी पडणार, शाळा बंद होणार. तुम्ही गावी जाणार. पण कधी मोकाट नसेन मी. तुम्ही याल ना मला भेटायला?
वाट पाहीन मी तुमची.
hope it's help
mark as brainliest ❤️ please please