India Languages, asked by Anonymous, 11 months ago

Marathi essay on aai babache prem​

Answers

Answered by Anonymous
29

आई आणि बाबाचे प्रेम

'प्रेम' या शब्दात एक मजेशीर गुप्ती लपलेली आहे . एखाद्या गोष्टींविषयीची (वस्तुविषयी) अथवा व्यक्तीबद्दल आकर्षण , आसक्ती वा त्यावर स्वामीत्व , अधिपत्य गाजवणे याला देखील काही लोकं प्रेम या शब्दाने संबोधतात पण खऱ्या अर्थाने प्रेम म्हणजे काय ? प्रेम हे आसक्ती , आकर्षण नसून , एक जिव्हाळ्याची भावना असते. आई बाबांचे प्रेम हे मानवी जीवनात सर्वात श्रेष्ठ मानले जाते. कारण ते निस्वार्थ भावनेने केवळ आपल्या पाल्याच्या सद हितासाठी आणि त्याच्या उत्तुंग भविष्याच्या तडजोडीने केलेले दिसून येते , आई-बाबांच्या प्रेमातून संस्काराची जान होते. देशाचा श्रेष्ठ नागरिक कसा घडावा यांचे धडे त्यांच्या प्रेमात लपलेले असतात.

आई-बाबांचे प्रेम केवळ प्रेम नसून त्यांच्या पाल्यांच्या पालनपोषणाचे कर्तव्य असते ! आई-बाबांचे प्रेम हे एखाद्या कडवट औषधी सारखे असते चवीला कडू पण आरोग्यासाठी चांगले अर्थातच पाल्यांच्या जडणघडणीसाठी चांगले ! त्यांचे प्रेम केवळ भावनिक नसून , तार्किक असते.

Similar questions