India Languages, asked by sona21907, 1 year ago

marathi essay on aamchi sahal​

Answers

Answered by Anonymous
23

i hope it helped thanks please mark me brilliant

Attachments:
Answered by rachita07
29

आमची सहल

तसे परदेशाचे कौतुक आता कुणालाच राहिले नाही. कारण कुणा ना कुणाचे तरी नातेवाईक परदेशात जाऊन आलेले आहेत.

सव जण सहलीला जातात. पण डोक्याला कसलाही ताण नाही आणि मुख्य म्हणजे खिशालाही झळ नाही, अशी सहल कुणी अनुभवली आहे काय? अशा सहलीची आम्हाला संधी मिळाली. आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत. माझा भाचा दीपक निलंगेकर आफ्रिकेत नॅरोबिन कोका कोलामध्ये आहे. त्याची बायको विद्या हिने आमच्या सहलीची व्यवस्था केली. त्यामुळे जंगले आणि जनावरांचा देश म्हणून ख्याती असलेला आफ्रिका देश पाहण्याची संधी लाभली. याआधी आम्ही आफ्रिकेतील जंगले आणि जनावरे फक्त टीव्हीवर पाहिलेली होती. मात्र या सहलीच्या निमित्ताने जंगले आणि त्यातील अनेक प्राणी पाहून धन्य झालो. हा अनुभव अविस्मरणीयच आहे. आपण भूगोलात विषुववृत्त शिकलो. ते प्रत्यक्ष पाहताना वेगळीच मज्जा येते. जिथून हा पट्टा गेला आहे त्यापासून 20 मीटर पुढे डाव्या बाजूला पसरट भांड्यात पाणी घेऊन जायचे. त्या पाण्यात छोट्या-छोट्या काड्या टाकायच्या, त्या काड्या क्लॉकवाइज फिरतात. तसेच विरुद्ध बाजूला गेल्यावर अँटी क्लॉकवाइज फिरतात. त्यांना डिस्टर्ब केल्यावर काही क्षण थांबतात आणि परत तशाच फिरतात. हा निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल. अशी आमची सहल मस्त झाली. परदेशात जाऊनही इंडियन फूड मिळाले. एकदा देवळात गेल्यावर तेथे पार्किंगमध्ये ट्राफिक जाम झाला होता. पण शेवटच्या गाडीचा चालक येईपर्यंत सर्वजण शांत बसले. हॉर्न नाही. गोंधळ नाही. मग शांतपणे एक-एक गाडी बाहेर पडली. रस्त्यावरही आम्हाला हॉर्न ऐकू आला नाही. तसे परदेशाचे कौतुक आता कुणालाच राहिले नाही. कारण कुणा ना कुणाचे तरी नातेवाईक परदेशात जाऊन  आलेले आहेत. अनेकांना परदेशवारी घडली आहे.  मात्र माझ्या भाच्याच्या बायकोने आमची जी सहल घडवली, ती सहल आयुष्यभर माझ्या लक्षात राहील अशीच अविस्मरणीय आहे

Similar questions