India Languages, asked by priyankahasija19, 1 month ago

marathi essay on आधुनिक तंत्रज्ञान - शाप किंवा वरदान​

Answers

Answered by rahuljagtap03857
3

Answer:

विज्ञानाच्या सहाय्याने माणसाला आपल्या आयुष्यमान ही वाढवले आहे. आज माणसाने वैद्यकीय क्षेत्रात अनेक प्रयोग केले आहेत. त्यामुळे माणूस दीर्घायुष्य झाला आहे. अनेक असाध्य आजारावर त्याने मात केली. विविध आजारांचे प्रत्यारोपण आता माणूस करू शकतो. त्वचारोपण, रक्त बदल, किडनी बद्दल अशा अशक्य गोष्टी माणसाला आज विज्ञानाच्या सहाय्याने शक्य झाले आहेत.

 माणसाने विज्ञानाच्या सहाय्याने अनेक चमत्कार सध्या केले आहेत. ' टेस्ट ट्यूब बेबी' हा त्यापैकी एक प्रकार. वैज्ञानिकांचे प्रयोग सतत चालू असतात. " क्लोनिंग" हे त्यापुढील एक पुढचे पाऊल आहे. डोली पासून त्याची तशीच डोली तयार केली आहे. संगणक आणि इंटरनेट हे आजच्या युगातील फार मोठी किमया आहे. हजारो किलोमीटरवर असलेल्या प्रियजनांचा आवाज घरबसल्या आपण स्पष्ट ऐकू शकतो. पुण्यात आजोबांनी गणपतीला आरती केली आणि त्याच वेळी अमेरिकेतील नातीने आरती म्हटली. हे शक्य झाले विज्ञानाने !!  आज इंटरनेटने माणसाच्या ज्ञानाचा धबधबा खुला केला आहे. चार देशातील राष्ट्रप्रमुख आपापल्या देशात बसून एकत्र चर्चा करू शकतात. ते केवळ विज्ञानामुळे विज्ञान आणि जग जवळ आले आहे. असे हे विज्ञान मानवाला मिळालेले वरदान आहे. पण त्याचा अतिरेक व दुरुपयोग वाईटच. रासायनिक खतामुळे पिके चांगली येतात, पण हे दिसू लागताच आपण त्याचा भरमसाठ वापर करू लागलो. त्यामुळे पिके चांगली येतात जमीन नापीक होऊ लागली. आपण हिंस्र श्वापदांचा मारण्याकरता असते तयार करता करता माणसांना मारण्यासाठी   शस्त्र तयार करू लागलो. अतिरेक वा दुरुपयोग शेवटी माणसाला नशा कडेने  नेतो. म्हणून आपण विज्ञानाकडे कसं पाहतो, त्याचा कसा उपयोग करून घेतो, यावरच विज्ञाने लाभदायक आहे नुकसान कारक आहे हे ठरणार आहे.

Similar questions