marathi. essay. on. doordarshan. che. fayde. tote
Answers
■■ दूरदर्शनचे फायदे व तोटे■■
दूरदर्शन आज आपल्या सगळ्यांसाठीच एक महत्त्वपूर्ण आवश्यकता बनलेली आहे.दूरदर्शन विज्ञानाचा चमत्कार आहे आणि याचे अनेक फायदे आहेत.
दूरदर्शनमुळे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींबद्दल,बातम्यांद्वारे जगात काय काय घडत आहे,हे कळते.दूरदर्शनवर आपण वेगवेगळे नाटक,सिनेमा पाहू शकतो,गाणी ऐकू शकतो.दूरदर्शनवर आपण विविध खेळांचे थेट प्रसारण पाहू शकतो.
पण जसे प्रत्येक गोष्टीचे फ़ायद्यांसोबत तोटे असतात.त्याचप्रकारे, दूरदर्शनचे सुद्धा काही तोटे आहेत.
बरेच लोक विशेषतः लहान मुले आपला अभ्यास करण्यापेक्षा दूरदर्शनवर कार्टून पाहत राहतात,त्यामुळे त्यांचा अभ्यास होत नाही.
तसेच बराच वेळ एकाच जागेवर बसून दूरदर्शन पाहत राहिल्यामुळे शारीरिक व्यायामसुद्धा होत नाही.दूरदर्शनावरील काही हिंसात्मक आणि गुन्हे दाखवणाऱ्या कार्यक्रमांमुळे लोकांच्या मनावर नकारात्मक प्रभाव पडतो.
अशा तऱ्हेने, दूरदर्शनचे फायदे व तोटे दोन्हीं आहेत.