India Languages, asked by arwahusein20031, 1 year ago

Marathi essay on exercise

Answers

Answered by dore
56
सकाळी लवकर उठून व्यायाम करणं हे शरीरासाठी फायदेशीर असतं, असं आपण अगदी पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. त्याप्रमाणे हल्लीची तरुणपिढीही फिटनेस आणि आरोग्याच्या बाबतीत जागरुकही झालीत. त्यामुळे योग्य डाएट आणि व्यायाम करण्यावर तरुण मंडळी भर देतात. पण व्यायाम करताना आपण कधी-कधी लहानशा चुका करतो ज्यामुळे व्यायाम करणं हे आपल्यासाठी कंटाळवाण काम ठरतं.
चूक- सारखा तोच-तोच व्यायाम प्रकार करणं
उपाय- सारखा तोच-तोच व्यायाम प्रकार केल्याने शरीर आणि मन थकतं. तसंच कालांतराने व्यायाम करणं कंटाळवाण काम वाटायला लागतं. यासाठी व्यायाम करताना लहानसा ब्रेक घ्यायला हवा. जेणेकरुन व्यायाम करण्यास उत्साह येईल.

चूक- कमी प्रमाणात खाणं
उपाय- कमी खाल्ल्याने व्यायाम करण्यास शरीरात ऊर्जा राहत नाही. शरीरातील ऊर्जा कमी झाल्याने व्यायाम करण्याचा कंटाळा येतो असं अनेकजण कारणं देतात. योग्य प्रमाणात आहार घेतल्यास शरीरातील ऊर्जा वाढते. त्यामुळे व्यायाम करण्यास सहाजिकच उत्साह येतो.

चूक- प्रमाण प्राप्त प्रशिक्षक नसणं
प्रमाणपत्र प्राप्त प्रशिक्षकच तुमच्यासाठी योग्य व्यायामाचा आराखडा आखतात. तुमची शरीरयष्टी, जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या सवयीनुसार प्रशिक्षक तुमच्याकडून व्यायाम करुन घेतो. तसंच प्रशिक्षकच तुम्हाला व्यायाम करण्यास योग्य प्रकारे प्रोत्साहन देऊ शकतो.

चूक- तुम्हाला व्यायामानंतरच्या निकालाची चिंता नसते.
उपाय- एखाद्या कामात यश मिळाल्याने आपल्याला प्रोत्साहन मिळतं, हे व्यायामाच्या बाबतीतही खरं आहे. तर तुमच्या व्यायामाची पद्धत ही स्मार्ट असू द्या. तुम्ही जो व्यायाम करता त्यातून मिळणाऱ्या निकालाचा मागोवा घ्या आणि त्यानुसार तुमच्या व्यायामपद्धतीत बदल करा.

चूक - सतत तक्रार करणं
सतत तक्रार केल्याने एखाद्या कामातील मज्जा निघून जाते. जेव्हा तुम्ही एखादं काम सकारात्मक दृष्टिकोनातून पाहता तेव्हा ते काम करण्यासाठी अधिक उत्साह येतो. अशाने तुम्हाला व्यायाम करण्याचा किंवा इतर काहीही काम करण्याचा कधीच कंटाळा येणार नाही.
Answered by halamadrid
43

Answer:

निरोगी आणि सुदृढ शरीरासाठी व्यायामाची महत्त्वपूर्ण भूमिका असते.आपल्या शरीर आणि मनासाठी कोणत्याही प्रकारचे व्यायाम उपयोगी ठरते.नियमित व्यायाम करण्याचे विविध फायदे आहेत.

रोज व्यायाम केल्यामुळे आपले तणाव,नैराश्य दूर होते,ज्यामुळे आपले मन प्रसन्न होते.व्यायामामुळे आपले वजन नियंत्रणात राहते.डायबिटीज,हृदयरोग आणि विविध आजारांपासून आपण दूर राहतो.व्यायामामुळे आपले हाडे व स्नायू मजबूत होतात.

व्यायामामुळे आपली मनःस्थिति सुधारते,आपले विचार सकारात्मक होतात,आपला काम करण्यासाठी उत्साह वाढतो.

व्यायामामुळे आपण आनंदी होतो.आपली स्मरणशक्ति व आरोग्यात सुधार होतो.व्यायामामुळे आपल्याला चांगली झोप लागते व आपल्या शरीराला आराम मिळतो.त्यामुळे त्वचेवर तेज येतो.

अशा प्रकारे,व्यायामाचे विविध फायदे आहेत.त्यामुळे प्रत्येकाने रोज व्यायाम केलेच पाहिजे.

Explanation:

Similar questions