marathi essay on गुरुंची शिकवण
Answers
प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे, असा आमच्या आईचा आग्रह असे. ती मला, रुप्याला, दादाला सहलीला पाठवी, स्कॉलरशिपला बसवी, गावात सर्कस आली तरी घेऊन जाई. पोहायला पाठवी. एवढेच नव्हे, तर मोदक करताना थोडी जास्त उकड काढून तिघांना मोदकही वळवायला बसवी. बाबा आईला ‘विद्यापीठ’ म्हणत थट्टेने. मला नि रुप्याला विद्यादेवीच्या रूपात आई पीठ चाळते आहे, असे तेव्हा वाटे. शाळेत वक्तृत्व, निबंध स्पर्धा असल्या की आई भाग घ्यायला लावी. नंबर नाही आला तरी चालेल; पण भाग घ्यायचा, असे तिचे रोखठोक म्हणणे असे.
रुप्याचे भाषण म्हणजे ‘भगवान ही मालिक’ असे. त्याच्या नाकातून, डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागत. खिशातला भाषणाचा कागद इतका चुरगळलेला असे की वाचणे कठीणच. चौथीनंतर त्याने कशातही भाग घेतला नाही. काजूबिया खेळण्यात आणि ढप्पर जमविण्यात तो एक्स्पर्ट होता. विटी-दांडूही तो उत्तम खेळे; पण या खेळांना काही राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित करण्यात आलेले नव्हते, येणार नाही. नाही तर रुप्याने त्यातले पदक ऑलिंपिकमध्येही मिळविले असते.
शाळेत टिळक पुण्यतिथी, गांधी जयंती साजरी करण्यात येई. शाळेचाच कुणी मुलगा-मुलगी अध्यक्ष असे. सर्वांची भाषणे झाली की अध्यक्ष भाषण करे. मुख्याध्यापिका भिडेबाई चार शब्द बोलत आणि कार्यक्रम संपे. टिळकांचे भाषण करणे सोपे जाई. त्यांची संत, सन्त, सन्त शब्दांची गोष्ट, वरच्या वर्गातल्या मुलाकडून गणित सोडवून घेतल्याची गोष्ट, शेंगांच्या टरफलांची गोष्ट, बाणभट्टाच्या कादंबरीची गोष्ट अशा कितीतरी गोष्टी माहिती होत्या. गांधी जयंतीला भाषण करणे कठीण वाटे. त्यांची दांडीयात्रा नि मिठाचा सत्याग्रह एवढेच माहीत असे. गोष्टी अशा जास्त माहितीच नव्हत्या.
एका गांधी जयंतीला मला भाषण येत नव्हते. मला ते कुणी लिहून दिले नव्हते म्हणा किंवा मलाही पुस्तके वाचून भाषण लिहून काढायला जमले नव्हते म्हणा. त्यामुळे मी भागच घेतलेला नव्हता. सातवीतली वैशाली हळबे तेव्हा अध्यक्ष झाली होती. एक एक करून सा-यांनी भाषणे केली. ‘महात्मा गांधी की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय हिंद’ असे काही म्हणून भाषणे संपत. टाळ्यांचा कडकडाट होई.
आशा आहे की ते उपयुक्त ठरेल

मला अस्वस्थ व्हायला लागले. सगळे भाषणे करतात, आपण करत नाही म्हणजे काय? माझे भाषण व्हायलाच हवे. टाळ्यांचा गजर व्हायलाच हवा, असे वाटून मी उठले. तेथे मुख्याध्यापिका भिडेबार्इंजवळ गेले. ‘ओ बाई, मला पण भाषण करायचे आहे.’ ‘अगं, कर नां मग, कर हां.’ बाई पाठीवर थाप मारत म्हणाल्या. ‘पण बाई मला गांधीजींचे भाषण येत नाही.’ ‘अरे बापरे! मग काय नि कसं करणार गं तू भाषण?’ ‘पण बाई..., मला टिळकांचं भाषण येतं, बाई.. मला करू द्या ना हो भाषण.’ ‘बरं बरं, सर्वांची भाषणे संपली की कर हो.’ मी आनंदात जागेवर जाऊन बसले. माझे टिळकांचे भाषण झाले. ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही’ या वाक्यावर जोरात टाळ्या मिळाल्या. ‘गांधीजींना वंदन करून, मी टिळकांचे भाषण संपवते. या दोघांनाही माझे प्रणाम!’ असे म्हणून मी थांबले. टाळ्यांचा नुसता गजर!
गांधी असोत नाही तर टिळक; कोणाच्या वेळी कोणाचे भाषण केले म्हणून काय बिघडले? एक जहाल, दुसरा मवाळ. एक लोकमान्य, दुसरे महात्मा. दोघांनीही देशासाठी आयुष्य वेचले. माझ्या बार्इंना हे समजले. म्हणूनच माझ्यासारख्या लहान मुलीचा उत्साह आणि आत्मविश्वास त्यांनी वाढवला. बार्इंसारखे सर्वांनाच हे समजले तर किती बरे होईल!