India Languages, asked by Such7479, 11 months ago

Marathi essay on Internet use and misuse

Answers

Answered by halamadrid
0

■■इंटरनेटचे वापर आणि गैरवापर■■

इंटरनेट आपल्या प्रत्येकाच्या जीवनात महत्वाचा भाग बनलेला आहे.इंटरनेटचे अनेक उपयोग आहेत.

इंटरनेटमुळे आपल्याला विविध गोष्टींची,विषयांची माहिती मिळते.इंटरनेट सेवेचा उपयोग करून आपण गूगल किंवा यूट्यूब वर वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतो,जगाबद्दल आपले ज्ञान वाढते,अभ्यासात व कामात आपल्याला मदत होते.

इंटरनेटमुळे आपण आपल्या मित्र-मैत्रिणींशी, नातेवाईकांशी संपर्क साधू शकतो, ऑनलाइन शॉपिंग करू शकतो, घरबसल्या आपले काम करू शकतो,आपल्या बैंक खात्याची माहिती ठेवू शकतो.

परंतु, इंटरनेटचे काही नुकसान देखील आहेत.काही लोक इंटरनेटचा दुरुपयोग करून सोशल मीडियाच्या मदतीने सामाजिक हिंसा,खोट्या बातम्या पसरवतात.इंटरनेटमुळे लोकांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो.

काही लोक सायबर छेडछाड आणि सायबर गुंडगिरीचा आणि इतर वेगवेगळ्या सायबर गुन्हांचा शिकार होतात.लोक इतर लोकांसोबत कमी आणि इंटरनेटवर जास्त वेळ घालवू लागली आहेत.

अशा प्रकारे,इंटरनेटचे फायदे तसेच नुकसान देखील आहेत.

Similar questions