marathi essay on maazi aai
Answers
Answer:
माझी आई
Explanation:
माझी आई मला खूप प्रिय आहे मी तिला कधीही एकटी राहून देत नाही आई शिवाय मला करमत नाही
माझी आई
"स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी" हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य अगदीच खरं आहे. आपल्याजवळ खूप धन आहे, पण जर मायेने डोक्यावर हाथ फिरवणारी आई नाही तर मग आपले जीवन व्यर्थ आहे. जेव्हा एक बालक बोलायला शिकतो तेव्हा पहिले अक्षर तो बोलायला शिकतो ते म्हणजे आई.
माझ्या आईबद्दल मी काय सांगू. माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे ती. प्रत्येक क्षणी, जीवनातील प्रत्येक कठीण वाटेवर माझ्या सोबत उभी राहते ती माझी आई. लहानपणा पासून आज पर्यंत मी तिला बघतो आहे. पहाटे सर्वप्रथम ती उठते, मला उठवते, शाळे करता तैयार करते, माझा नाश्ता बनवते, माझी बैग पैक करण्यास मदत करते। माझा डब्बा सुद्धा मी शाळेत निघायच्या आत तयारच असतो.
ही तिची रोजचीच दिनचर्या आहे। सकाळी लवकर उठणे, मला शाळेत व बाबांना ऑफिसामध्ये पाठवणे, घरकाम करणे, संध्याकाळी माझा अभ्यास घेणे व माहिती नाही आणखी किती काम ती करते ते. आणि एवढं केल्यानंतर ही कधीच तिच्या चेहरा वर तो त्रास नाही दिसत कि कधी कंटाळा नाही दिसत.
एकदा तर मला खूप ताप आला असताना ती रात्रभर माझ्या शेजारी बसून पाण्याची पट्टी माझ्या माथ्यावर ठेवत बसली होती। सदा न कदा माझ्या आवड़ीं-निवड़ींची काळजी घेत असते माझी आई.
मला जे चांगले संस्कार लाभले आहेत ते तुझीच देणगी आहे. मी कितीही आईबद्दल लिहिले तरी ते कमीच वाटणार.. पण आईला नेहमी आनंदात ठेवणं व माझ्याकरिता घेतलेल्या कष्टांच चीज करणं हेच माझ्या जीवणाचं खरं उद्देश्य आणि लक्ष्य आहे।