Marathi essay on Maji Aai
Answers
माझी आई सुद्धा अशीच सामन्य पण तरीही असामान्य आहे. लहानपणापासून बघितले तिला दिवस-रात्र घरात कष्ट करताना. पहाटे सर्वात आधी उठून स्वयंपाक घरात खुडबुड करणाऱ्या आईमुळे झोपमोड होते पण जेव्हा बिछान्यातून बाहेर येऊन ब्रश केल्यावर लगेचच समोर गरमागरम नाश्ता आणि वाफाळलेला चहाचा कप येतो तेव्हा उरल्यासुरल्या सुस्ती सोबतच चिडचिडेपणा निघून जातो. मग सुरु होते आईची धावपळ – आई अंघोळीसाठी पाणी काढ ना, आई माझे कपडे कुठे आहेत, डबा भरला का? मला नाही आवडत हि भाजी, बेसनची पोळी दे काढून. किती किती ऑर्डर्स एका पाठोपाठ एक. पण कधीही त्रागा न करता आई सर्व फर्माईशी पूर्ण करत असते. या मध्ये बाबांचे आणि आजीचे आदेश तर वेगळे असतातच. कुठून आणते आई एवढा सगळा उत्साह आणि शक्ती देव जाणे. मला तर सकाळी उठून शाळेत जायचे म्हटले तरी जीवावर येते. आभ्यास करणे म्हणजे खूप मोठी जबाबदारी वाटते.
एकदा आईला म्हटले सुद्धा, तुझ आयुष्य किती छान आहे, ना अभ्यासाची कटकट ना परिक्षेच टेन्शन ना रिझल्टची भीती. आई हसून बोलली तुला कोणी सांगिलत कि मला अभ्यास नसतो, दररोज सर्वांच्या आवडी निवडी प्रमाणे जेवण-नाश्ता बनविणे, तुमची सांगितलेली कामे लक्षात ठेवून करणे हे काही गृहपाठापेक्षा कमी आहे का? आणि परिक्षेच बोलाल तर माझी तर रोजच परीक्षा असते. आणि रोजच माझा रिझल्ट लागतो. माझा प्रश्नांकित चेहरा बघून हसून बोलली – आज भाजी चांगली नाही झाली, मीठ कमी आहे आमटीत, चटणी छान झाली आहे… तुम्ही सर्वजण वेळ न दवडता माझ्या कामाचे प्रगती पुस्तक देऊन मोकळे होतात.
खरच किती खरी गोष्ट आहे ना, आपण आपल्या खास मित्र-मैत्रिणींना सुद्धा इतक्या सहजपणे सांगत नाही कि ते चुकले आहेत, किंवा त्यांचं वागण बरोबर नाही, किती सावधानतेने त्यांचं मन न दुखवता त्यांच्याशी बोलतो पण आई, आईच्या मनाचा कधीच इतका खोलवर विचार करत नाही. आपल्या वागण्या बोलण्याने ती दुखावेल असा विचारही मनात येत नाही. किती गृहीत धरून चालतो आपण आईला. बाबांना राग येणार नाही याची काळजी घेतो, फ्रेंड्सना वाईट वाटणार नाही याचीहि काळजी घेतो. पण कधीही आईच्या मनाची काळजी करत नाही. कधी कधी तर इतरांचा रागही तिच्यावर काढतो पण ती एखाद्या संताप्रमाणे सारे काही सहन करते आणि वाट बघते तुमचा राग शांत होण्याची, आणि मग काहीही घडलं नसल्याप्रमाणे वागू लागते, अपेक्षा नाही करत की तुम्ही तुमची चूक कबूल कराल; तुमच्या माफी माग्ण्यापुर्वीच तुम्हाला माफ करून मोकळी झालेली असते.
माझी आई आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे याची मला कधी कल्पना हि नव्हती. किती सहजपणे आपली कर्तव्य पार पाडत आपली आवश्यकता बनून जाते. मला हे तेव्हा समजले जेव्हा एकदा माझी आई आजारी पडली. आई सोबतच संपूर्ण घर आजारी पडल्या सारखे वाटत होते. आई तापामुळे आणि डोकेदुखी मुळे हैराण झाली होती. बाबांनी तिला आराम करायला सांगितले आणि घराची जबाबदारी स्वतः उचलली. त्या दिवशी ना नाश्ता वेळेवर मिळाला ना जेवण. चवीचं तर विचारूच नका. घर आवरलं नसल्यामुळे अस्त्यावस्त पडले होते. किचनच्या सिंक मध्ये भांड्यांचा ढीग पडला होता. तीच स्थिती बाथरूमची सुद्धा झाली होती. असं वाटतच नव्हत की हे आपलं घर आहे. खूप प्रयत्न केला मी आणि बाबांनी सर्व आवरण्याचा पण कुठून सुरवात करावी आणि काय काय कराव हेच कळत नव्हत. माझी आई रोज एवढी काम करते की जी मला आणि बाबांना सुद्धा संपत नव्हती, आणि ती सुद्धा हसतमुखाने. त्यादिवशी पासून माझ्या आणि बाबांच्या मनात आई बद्दल आदर आणि प्रेम दुप्पटीने वाढले. मी तर मनापासून ठरवलं की आजपासून आईला जास्त काम सांगायची नाहीत. जेवढी जमतील तेवढी काम स्वतःच करायची. तिला तिच्या कामात सुद्धा शक्य तेवढी मदत करायची.
आईला जेव्हा संध्याकाळी थोड बर वाटलं तेव्हा उठली आणि लगेचच कामाला लागली. मी आणि बाबा होतोच मदतीला. तेव्हापासून आजपर्यंत कधीही आईला विचारल नाही कि तू दिवसभर घरी काय करत असतेस? कारण आईने न सांगताच आम्हाला कळाल की आई फक्त एक माणूसच नाही तर ती आमच्या घराचा आत्मा आहे, कणा आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे का म्हणतात हे आता मला खऱ्या अर्थाने उमगले.
देव स्वत: जग येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला पाठवले. संपूर्ण जग, ज्याच्यात सामावले जाते तेच आईचे मातृत्व आहे. वयासह मातृत्वाची पकड निश्चितपणे कमकुवत होत असते, परंतु प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सावलीत आयुष्य जगण्याची इच्छा असते. कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी !!!
माझी आई एक शिक्षक आहे ती शाळेत मराठी शिकवते. आम्ही सर्वजन उठवण्याच्या काही क्षण आधी पहाटे सकाळी उठून आई घरकाम करायला लागते. आम्हा प्रत्येकासाठी नाश्ता, दुपारचे जेवण आणि घराची देखभाल हे सर्वकाही तीच करते. आम्ही देखील तिला सर्व काही मदत करतो. परंतु घराची संपूर्ण व्यवस्था तिच्यावर अवलंबून असते. आश्चर्य वाटण्यासारखे आहे की आई एखाद्याच्या आवडीनुसार आणि गरजानुसार सर्व कामे कशी काय करू शकते. ति आम्हाला शाळेतून मिळालेला गृहपाठ पूर्ण करण्यासही मदत करते. आई आम्हाला सुलभ आणि सोप्या पद्धतीने जगभरातील चांगल्या आणि ज्ञानी गोष्टी समजून सांगते. तिला आमच्या बुद्धीचा चांगला अंदाज आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या घरात आजारी पडते. तेव्हा आई त्याची देखील देखभाल अत्यंत चांगल्या रितीने करते. शिक्षक म्हणून, माझी आई नेहमीच प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन करते. आम्ही आईवर खूप प्रेम करतो. आई जरी रागावली तरीसुद्धा तिच्या बद्दल मनात राग येत नाही कारण प्रेम आईच्या रागामध्ये देखील लपलेले आहे. म्हणूनच आई हे एक देवाचेच रूप आहे.