marathi essay on mala dev bhetla tar
Answers
Answer:
देवाचे दर्शन घेण्यासाठी लोकं कुठे कुठे जातात,पण कोणीच त्याला प्रत्यक्षात पहिले नाही.जर मला देव भेटला तर!,हा विचारच मुळात खूप भन्नाट आहे.
जर कधी मला देव भेटला तर!,तर मला स्वतःला आधी सावरायला लागेल,कारण ज्याला पाहण्यासाठी लोकं जगभर फिरतात तोच आज माझ्यासमोर आला आहे.मी देवाला पाहुन खूप जास्त खुश होईल.त्याला नमस्कार करणार. त्याला डोळे भरून पाहणार.त्याचे औक्षण करणार.त्याच्यासाठी त्याचे आवडीचे पदार्थ बनवणार.
मग त्याच्याशी गप्पा मारणार.मी त्याला विचारणार की त्याने या सृष्टीची रचना कशी केली?हा निसर्ग कसा बनवला?मानव जातेचे निर्माण कशा प्रकारे केले?
माझ्या कुटुंबातील सगळ्यांना व माझ्या मित्र मैत्रिणींना सुखी व समाधानी ठेव अशी विनंती करणार.आज देशात होत असलेल्या दहशतवाद,भ्रष्टाचार,गरीबी,जातीवाद,महिलांवरील घरगुती हिंसाचार,उपासमार अशा सामाजिक समस्यांना संपवून टाकण्याची विनंती करणार.
आता मी देवाचा इतका वेळ घेतला आहे,तर त्याला सुद्धा त्याच्या घरी जावंच लागणार,ना. जाताना,मी त्याच्याकडे प्रार्थना करणार की त्यांनी माझ्या इच्छा पूर्ण कराव्या आणि मला भेटायला परत यावे.
Explanation: