marathi essay on mama cha gaon
Answers
Answer:
पायवाट. मुंबईसारख्या गजबजलेल्या, वखवखलेल्या शहरात राहणाऱ्या आमच्यासाठी हे गाव म्हणजे जणू स्वर्गच होता.
पायवाट. मुंबईसारख्या गजबजलेल्या, वखवखलेल्या शहरात राहणाऱ्या आमच्यासाठी हे गाव म्हणजे जणू स्वर्गच होता.निसर्गरम्य कोकण. त्यातलं कणकवली हे माझ्या मामाचं गाव. लाल मातीनं माखलेलं. आंबा, फणसांनी लडबडलेलं. कोसावर झुळझुळू वाहणारी नदी अन् तिथपर्यंत जाणारी निमुळती पायवाट. मुंबईसारख्या गजबजलेल्या, वखवखलेल्या शहरात राहणाऱ्या आमच्यासाठी हे गाव म्हणजे जणू स्वर्गच होता. उन्हाळ्याची सुट्टी लागली की मामाचं गाव खुणावायचं. मऊशार वाळू अन् ते नितळ स्वच्छ, गार पाणी ओढ लावायचं.
घराचा माळा स्वच्छ केला की तिथं गप्पांचा फड रंगायचा. पहाटे लवकर उठून मामाची पावलं शेताकडे वळत आणि आमची नदीकडं. आई डोक्यावर धुणं घेऊन लगबगीनं नदीकडे चालू लागली की तिच्यामागोमाग आमची स्वारी तिरावर पोहोचे. अन् मग सुरू होई खेळ पाण्यात दगड टाकून वाटोळ्या होत गेलेल्या तरंगाकडे बघत राहण्याचा. पाण्यात पाय टाकून तासन तास बसून राहायचो आम्ही. कागदाच्या नावा पाण्यात टाकून त्यांच्या मागेमागे पळण्यात तर भारी मजा यायची.
घराचा माळा स्वच्छ केला की तिथं गप्पांचा फड रंगायचा. पहाटे लवकर उठून मामाची पावलं शेताकडे वळत आणि आमची नदीकडं. आई डोक्यावर धुणं घेऊन लगबगीनं नदीकडे चालू लागली की तिच्यामागोमाग आमची स्वारी तिरावर पोहोचे. अन् मग सुरू होई खेळ पाण्यात दगड टाकून वाटोळ्या होत गेलेल्या तरंगाकडे बघत राहण्याचा. पाण्यात पाय टाकून तासन तास बसून राहायचो आम्ही. कागदाच्या नावा पाण्यात टाकून त्यांच्या मागेमागे पळण्यात तर भारी मजा यायची.दुपारी आई कोंबडीचा बेत करायची. आजीनं पाट्यावर मसाला वाटला की तोंडाला पाणी सुटे. तर्रीदार तिखट भाजी, भाकरी अन् आंब्याचा रस. वा…! मग पोटात चांगलीच आग भडकायची. त्यावर उतारा म्हणून आजीनं पेज दिली की थंडगार वाटायचं. दुपारी निजानिज झाली की आमची स्वारी फणसाच्या शोधात फिरे. गुपचूप त्यातले गरे खायला जाम मजा वाटे. पण, आईचा ओरडा पडला की आणखीनच मजा येई. सायंकाळी सात वाजता अंधार पडे. अंगणात खाटा टाकून आकाशातले तारे मोजत आजीच्या भुताखेताच्या गप्पांचा फड रंगे. आता त्या गप्पाही नाही नि नदीही नाही अन् वेळही नाही, अशी मजा करायला.