marathi essay on मतदानाची गरज
Answers
Answer:
मतदान ही एखाद्या गटास अथवा समूहास, विशिष्ट निवडणुकीसाठी अथवा एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी लिखित अथवा ठरविलेल्या माध्यमाद्वारे (जसे: मतदान यंत्र इत्यादी.) मतप्रदर्शन करण्याची एक पद्धती आहे. याचा वापर चर्चा, वादविवाद अथवा निवडणूक प्रचारानंतर करण्यात येतो. लोकशाही राज्य प्रणालीत उच्च पदावरच्या व्यक्तिंसाठी निवडणूक घेऊन मतदान करण्यात येते.एखाद्या क्षेत्रातील अशा निवडणुकीसाठी ज्याला मतदान करण्यात येते तो उमेदवार असतो व जो मतपत्रिकेद्वारे अथवा ठरवून दिलेल्या पद्धतीद्वारे मतदान करतो तो मतदार म्हणून ओळखण्यात येतो. मतदारांनी केलेल्या मतांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची निवड केली जाते.
■■ मतदानाची गरज■■
मतदान हा आपल्या प्रत्येकाचा अधिकार आहे आणि आपण प्रत्येकाने मतदान केलाच पाहिजे.मतदान करून आपण आपल्या देशाला चालवण्यासाठी योग्य व श्रेष्ठ उमेदवार निवडू शकतो.देशाचे भविष्य मतदान करून आपण घडवू शकतो.
आपल्यामधील बरेचजण मतदान करत नाहीत आणि मग सरकारवर टीका करत राहतात.पण आपण हे विसरतो की सरकार निवडण्याचा अधिकार आपल्याकडेच आहे.
जर तुम्हाला कोणताही उमेदवार आवडत नसेल तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर नोटा(वरीलपैकी कोणीही नाही) हा बटन सुद्धा दाबू शकता.
मतदानाचे खूप महत्व आहे आणि देशाच्या प्रत्येक नागरिकाने मतदान करून देशाला योग्य सरकार निवडून दिली पाहिजे.