India Languages, asked by saloni2705, 3 months ago

Marathi essay on Mazha avadta rutu hivala​

Answers

Answered by riya47363h
10

आपल्या देशात हिवाळा, उन्हाळा व पावसाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत. या सर्व ऋतूंमध्ये माझा आवडता ऋतू म्हणजे हिवाळा !हिवाळ्याच्या दिवसात उबदार पांघरुणात झोपायला फार मजा येते; पण त्याचवेळी रस्त्यावर कुडकुडत झोपणाऱ्या गरिबांचीही आठवण येते. हिवाळा हा स्निग्धतेचा, प्रेमाचा ऋतू आहे. म्हणून या दिवसात अनेक स्नेहसंमेलने साजरी होतात.

Maza Avadata Rutu Hivala In Marathi

पावसाळ्यात भरपूर पाणी मिळाल्याने या ऋतूत निसर्ग तृप्त असतो. त्यामुळे भोवतालची सृष्टी नयनरम्य असते. या दिवसात पहाटे सर्वत्र धुके पडते. अशा वातावरणात अनेकजण उबदार गरम कपडे घालून सकाळी भटकायला निघतात. याच ऋतूत पक्षी स्थलांतर करतात.

हिवाळ्यात नाताळ हा सण येतो. सांताक्लॉज वेगवेगळ्या भेटी देतो. शाळेलाही सुट्टी असते. याच ऋतूत मकरसंक्रांत येते. हा सण मला फार आवडतो. सर्व माणसे एकत्र येतात. तिळगूळ एकमेकांना वाटतात. संक्रांतीच्या निमित्ताने तिळाचे लाडू करतात. उष्णता निर्माण करणारे हे पदार्थ या ऋतूला आवश्यक असतात. हिवाळ्यात काम करायला उत्साह वाटतो. या ऋतूत शेतावर हुर्खापार्टी होते. गावोगावी जत्रा भरतात. असा हा आपुलकी वाढवणारा ऋतू मला फार आवडतो.

मित्रांनो या निबंधामध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो

Similar questions