Hindi, asked by saishp6, 1 year ago

marathi essay on 'mi anubhavlali sahal'

Answers

Answered by samarth7946
6

सध्या टेक्सासमध्ये खरे तर उन्हाळा चालू आहे. पण 19 आणि 20 जूनला मात्र पावसाने संततधार लावली होती. अगदी कोकणात, मुंबईत आणि महाराष्ट्रात इतरत्र बरसणाऱ्या पावसाची आठवण यावी अशी. जगभरातल्या भारतीयांच्या मनात उत्सुकता दाटली होती ती 21 जूनच्या आंतराराष्ट्रीय योग दिनाची. ही अशी भारतप्रणीत संकल्पनेची प्रत्यक्ष अभिव्यक्ती जगभरात प्रकट होण्याच्या पहिला किरण त्या दिवशी उगवणाऱ्या सूर्याबरोबर अवतरणार होता. भारतात दिल्लीतील राजपथावर आणि अन्यत्र भव्य प्रमाणात उत्साहात आणि प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणि ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाच्या बातम्या आणि क्षणचित्रे अमेरिकेतील आणि जगातील भारतीय उल्हासित मनाने त्या रात्री अनुभवीत होते आणि ह्युस्टनची 21 जूनची सकाळ उजाडली तीच मुळी कालचे मळभ दूर सारून स्वच्छ प्रकाशाने आणि आल्हाददायक सूर्यकिरणांनी.

जॉर्ज ब्राऊन कन्व्हेन्शन सेंटर नेमके कुठे आहे? नवागतांनादेखील त्या दिवशी विचारावे लागत नव्हते. त्या परिसरात येणारी प्रत्येक गाडी प्रवेशद्वाराशी थांबत होती आणि गाडीतील कुटुंबीय लगबगीने आपल्या चटयांची (मॅट्सची) भेंडोळी पाठीवर टाकून प्रवेशद्वारातून प्रवेश करीत होती. समोरच येणाऱ्या प्रत्येकाला त्याची निर्देशित जागा दाखवून उपस्थितीचे चिन्ह देण्यात येत होते. सगळया टेबलांना भरपूर काम होते, कारण पूर्वनोंदणी करणाऱ्यांची संख्याच 3800वर जाऊन पोहोचली होती. आयत्या वेळी येणाऱ्यांची संख्या वेगळी. आत प्रवेश करताच भव्य सभागृहातील आतील व्यवस्था लक्ष वेधून घेणारी होती. आसने करायला सोयीच्या अशा सुमारे पाच हजार भगव्या रंगाच्या चटया व्यवस्थित अंथरलेल्या होत्या

Similar questions