marathi essay on my first train journey
Answers
I love traveling, and my first rail journey is still fresh in my mind.
I was 8 at that time, and we were going to Agra from Delhi to attend a relative’s wedding.
As I had never traveled by train before, I was excessively thrilled and enthusiastic about it.
I grabbed the window seat and started looking outside.
I remember how confused I felt to see everything going backwards.
Soon, I felt asleep and I was at the relative’s house when I opened my eyes.
Although it was a short journey, I still remember how I felt that day.
“माझा आगगाडीतील पहिला प्रवास”
"झुक झुक झुक झुक अगीनगाडी,
धुरांच्या रेघा हवेत काढी,
पडती झाडे पाहु या,
मामाच्या गावाला जावू या,
जावू या"।
ही कविता तर मी जेंव्हापासून बोलायला सुरुवात केली कदाचित तेव्हापासूनच म्हणत असेल. पण आगगाडी मात्र मी वयाच्या सहाव्या वर्षी दुरुनच बघीतली,आणि त्यानंतर ती पुन्हा पुन्हा बघण्याचा अट्टाहास मी करायची...असं माझी आई मला सांगायची.
आगगाडी विषयी खुप कुतूहल माझ्या मनात असायचं, एवढी लांब कशी ही गाडी आणि उतरायचे असेल तर थांबेल की नाही कारण तिचा वेग फार असतो ना......असे अनेक प्रश्न माझ्या मनात डोकावत असे.
एकदा माझ्या दुरच्या काकांच्या लग्नाला आगगाडी ने जायचा बेत ठरला. माझा आनंद तर गगनात मावेनासा होता.
जायचा दिवस उगवला आणि मी तब्बल वयाच्या दहाव्या वर्षी आगाडीची पायरी चढले.मी गाडी मध्ये खिडकी जवळची जागा पकडली लवकरच गाडी सुरू झाली आणि काय मज्जा..सगळी झाडे, घरं गाडीच्या उलट्या दिशेने जायला लागली,एकामागून एक नवीन गाव ,स्टेशन मागे पडायला लागले.
काही वेळानी आईनी घरून बनवून आणलेला डबा उघडला त्यात माझ्या आवडीचे लाडू ही होते,खिडकीच्या बाहेर बघतच मी सारे फस्त केले.
आणि काय मधेच गाडीमध्ये आंधार झाला मला जरा भितीच वाटली, मी बाबांना घट्ट पकडून ठेवले..१मिनीटाच्या आतच तो नाहीसा झाला मला जरा नवलच वाटले..बाबा मला म्हणाले,'घाबरू नकोस हा तर बोगदा होता गाडी त्यातून गेली म्हणून आंधार झाला होता'. ते ऐकून मला जरा बरं वाटलं
बघता बघता प्रवास संपला पण मन काही भरलं नाही, उतरल्यानंतर ही मागे वळून वळून मी त्या लांबच-लांब गाडी कडे बघत होते.बाबा म्हणाले,२दिवसा नंतर आपल्याला याच गाडी ने परत जायचे आहे. ते ऐकून मला खूप आनंद झाला.परतीच्या प्रवासात तर मी गाडीत जाम खेळले भिती ही नाहीसी झाली होती...निसर्गाचा ही भरपूर आनंद घेतला मला खूप खूप गंमत वाटली.
तो पहिला प्रवास खरचं न विसरण्यासारखा आहे.