Marathi essay on शब्द हरवले तर ....
Answers
दर्जा मिळवून देण्याची हालचाल सुरू झालीय. खरं तर मराठीतल्या शब्दांच्या खजिन्याची कल्पनाच नाही आपल्याला.
वाढतं नागरीकरण, फोफावलेलं काँक्रीटचं जंगल आणि त्यातली फ्लॅट संस्कृती, शेती-गावगाडय़ाचं यांत्रिकीकरण, तंत्रज्ञानाची वाढती आस, इंटरनेटनं जवळ आणलेलं जग यामुळं अस्सल मराठीतले अनेक शब्द आपण हरवलेत. मराठीचं माधुर्य दाखवणारे असंख्य शब्द काळाबरोबर अस्ताला जाऊ लागलेत, पण त्याचवेळी तंत्रज्ञानाच्या मायाजालानं आणलेल्या नव्या शब्दांची भर मराठीत पडू लागलीय.
- नेमकं हेच हेरून सांगलीतल्या शांतिनिकेतन लोकविद्यापीठानं आगळावेगळा उपक्रम राबवला. या संकुलातल्या यशवंतराव चव्हाण ग्रंथालयानं मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून शब्दशोध स्पर्धा घेतली. प्राथमिक, माध्यमिक स्तरावरच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यात सहभागी करून घेतलं.
मराठीत इतर भाषेतून आलेले शब्द, हरवलेले शब्द, ग्रामीण मराठीतील शब्द, अवघड, सरकारी आणि द्विअर्थी शब्द अशा गटात शब्द संकलित करून देण्याचं आवाहन करण्यात आलं. पाचशेवर मुलांनी आणि पन्नासभर शिक्षकांनी तब्बल एकोणीस हजार शब्दांचं संकलन केलं. त्यातले अडीच हजारांवर शब्द काळाच्या ओघात हरवण्याच्या मार्गावर असल्याचं, तर हजारावर शब्द चक्क हरवल्याचं दिसून आलं.
शेतीवाडीचं यांत्रिकीकरण होऊ लागलं, गावगाडय़ाला नागरीकरणानं भरकटून टाकलं, खेडय़ापाडय़ातली बलुतेदारी मागं पडली, फ्लॅट संस्कृतीनं नात्यांमध्ये दरी निर्माण केली.. तसं गावगाडय़ाला चिकटलेले मराठीतले शब्द हरवू लागले. गावाकडचं घर बदललं आणि ‘बंगलो स्किम’ आली.
- मग ओटा, पडवी, न्हाणीघर, माजघर, शेजघर, माळवद, वासं-आडं, दिवळी, खुंटी, फडताळ, परसदार, पोत्यारं हे शब्द विस्मरणात गेले.