Marathi essay on वृक्ष नष्ट झाले तर but it should be of 3 paragraph
Answers
अशा मोडलेल्या बिघडलेल्या चक्रांपैकी एक म्हणजे जंगल. गेल्या कित्येक शतकांपासून जंगल तोडले एवढाच उद्योग माणसाने केला आहे. शेतीसाठी, शहरांच्या वाढीसाठी, कारखान्यांना कच्चा माल पुरवण्यासाठी, इंधनासाठी, खाणींसाठी, रेल्वे आणि रस्त्यांसाठी अशा नानाविध कारणांसाठी आपण जंगल तोडत राहिलो. त्याचे दुष्परिणाम झोंबू लागले आहेत.
· जंगलतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे , आज सर्व डोंगर, जंगल हे वृक्षतोडीमुळे ओसाड झाले आहेत. औषधीयुक्त वनस्पतींची दुर्मिळता झाली आहे. त्यामुळे पाऊससुद्धा पडत नाही.
· ज्या प्रमाणात जंगलतोड होते त्या प्रमाणात लागवड न झाल्याने निसर्गाच्या या मौल्यवान संपत्तीचा फार मोठा ऱ्हास होत आहे, जो जैविक आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडवत आहे. दगडांच्या खाणींमुळे डोंगर-माथेही उजाड होत आहेत. अन् जवळच्या भागातील पर्जन्यमान कमी होत आहे. बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर झाले आहेत आणि त मानवी वस्त्यांत आसरा शोधात आहेत त्यामुळे महाराष्ट्रात किंवा इतर प्रदेशात अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत बिबट्या घुसल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत.
· दिवसेंदिवस होणार्या जंगल कटाईमुळे मातीची धूप, वृक्षांची कामरता, पावसाचे कमी होत जाणारे प्रमाण, वृक्षअभावी येणारे पूर अशा समस्या जगात जागोजागी भेडसावत आहेत. गतवर्षी केदारनाथला आलेला पूर हा जंगलतोडीचाच परिणाम असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
· वृक्षतोडीमुळे तापमानात वाढ होत आहे त्यामुळे बाष्पिभवनाचे प्रमाण वाढत आहे परंतु पर्जन्यवृष्टी मात्र त्या प्रमाणात होत नाही म्हणून जमिनीवर पाण्याचे साठे आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढत नाही ह्या समस्या आज निर्माण झाल्या आहेत.
hope it will be help you.
please mark as a BRAINLIST
Answer:
वृक्ष नष्ट झाले तर,लोकांना फार समस्या सहन कराव्या लागतील.वृक्ष नसले तर, आपल्यला श्वास घेण्यासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन कुठून मिळणार?सजावटीसाठी व औषधी गुणधर्म असणारे पाने व फुले कुठून मिळणार?वृक्ष नसले तर खायला फळे सुद्धा मिळणार नाही.
वृक्ष नसले तर, लोकांना उन्हाळ्यात सावली व पक्ष्यांना आसरा कुठून मिळणार?वृक्ष नसले तर घर बांधण्यासाठी,आग लावण्यासाठी व इतर उपयोगी वस्तू बनवण्यासाठी लाकूड मिळणार नाही.
वृक्ष नसल्यावर पर्यावरणावर गंभीर परिणाम होतील.पावसाचे प्रमाण कमी होईल.जागतिक तापमान वाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगमध्ये वाढ होईल.वातावरणात थंडावा राहणार नाही.वायुची गुणवत्ता खराब होईल.निसर्गाचा तालमेल बिघडून जाईल.प्राण्यांचे जीवनसुद्धा संकटात येईल.
निसर्गाचा सौंदर्य वाढवणाऱ्या झाडांकडे पाहून आपले मन शांत होते.वृक्ष खूप महत्वपूर्ण असतात.त्यामुळे जर ती नसली,तर आपले जीवन संकटात येईल.
अशा वेळी,प्रत्येकाने वृक्षतोड थांबवून नवीन वृक्ष लावली पाहिजेत.
Explanation: