marathi essay prasanglekhan
Answers
Answer:
A transpiration pull could be simply defined as a biological process in which the force of pulling is produced inside the xylem tissue. This force helps in the upward movement of water into the xylem vessels. In this process, loss of water in the form of vapours through leaves are observed.
Answer:
जमिनीवरील कागदकपटे , पालापाचोळा हवेत घुसळू लागले ... आणि काही क्षणांतच टपोऱ्या थेंबांचा ताडताड वर्षाव सुरू झाला . धुवाधार पाऊस कोसळू लागला . आभाळभर पाऊसच पाऊस होता . घराशेजारी , रस्त्यावर , शेतात , डोंगरात , दरीत सर्वत्र पाण्याचे लोटच्या लोट सुसाट धावू लागले . एखादया अवखळ दांडगट मुलाप्रमाणे पाऊस हुंदडत होता . आम्ही मुलेसुद्धा त्याच्या अवखळपणात सामील झालो , मनसोक्त नाचू लागलो . खरे सांगू का ? पाऊस आणि आम्ही एकत्रच नाचत होतो हा अनुभवच वेगळा होता . एरवी असा पाऊस आला की आम्ही पटापटा घरात घुसतो . दारेखिडक्या लावून घेतो . रस्त्यावर असलो तर रेनकोट घालतो . छत्र्या उघडतो . पावसाचा फारच जोर असला तर दुकानांचा , हॉटेलांचा आसरा घेतो .
आज मात्र वेगळेच घडत होते . पाऊस आणि आम्ही एकत्रच होतो . आम्ही पावसात शिरलो होतो की पाऊस आमच्यात शिरला होता , हे सांगणे कठीण होते . सर्व भोवताल पाऊसमय झाला होता . झाडे तर शेंड्यांपासून मुळांपर्यंत पाण्याने निथळत होती . मी मित्रमंडळींकडे पाहिले . सगळेजण झाडांप्रमाणेच निथळत होते . कानांवरून , नाकाच्या शेंड्यांवरून , हनुवटीवरून पावसाचे थेंब सरसर उतरत होते . ते दृश्य मनाला आनंद देत होते . पावसाच्या त्या शीतलस्पर्शाने जीव सुखावला होता . मन निवांत झाले होते . आता थोड्या वेळापूर्वी मनाची अवस्था काय झाली होती ? आणि आता पाहा . पावसाने केवढा कायापालट केला होता ! ही किमया फक्त पाऊसच करू शकतो . पाऊस हा ईश्वराचाच अवतार आहे