Marathi essay:
शेतकयाचे आत्मवृत
pls help its urgent
Answers
Answer:
मला शाळेला सुट्टी लागली होती म्हणून आम्ही आमच्या गावी जायचे ठरवले, आम्ही फारसे आमच्या गावात जात नाही कारण बाबा इथे शहरात नोकरी करतात, पूर्वी बाबांचे वडील म्हणजे माझे आजोबा शेती करायचे. माझ्या गावात सगळे शेतकरी आहेत पण आम्ही आता शेती करत नाही. शेतकऱ्यांना आता सरकार ची खूप साथ आहे
Answer:
मित्रमैत्रिणींनो, भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. शेती हा आपला मुख्य व्यवसाय आहे. परंतु ही शेती करणारा जो शेतकरी आहे त्याची अवस्था आज खूप बिकट होत चालली आहे. विशेषतः महाराष्ट्रातील शेतकरी आज खूप हालाखीचे जीवन जगत आहे. आज आपण यापैकीच एका शेतकऱ्याचे आत्मवृत्त जाणून घेणार आहोत.
नमस्कार मित्रांनो, माझे नाव सखाराम आहे. माझे वय ५५ वर्ष आहे आणि मी शेती करतो. म्हणजेच मी एक शेतकरी आहे. होय, मी एक शेतकरी आहे. माझे वडील व आजोबाही शेतकरीच होते. आमचा पिढ्यानपिढ्या शेतीचा व्यवसाय आहे. माझ्या कुटुंबात मी, माझी पत्नी, माझी दोन मुले आणि माझी आई आहेत.
माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची संपूर्ण जबाबदारी माझ्याच खांद्यावर आहे. शेतीचा व्यवसाय करूनच मी माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करतो आणि माझ्या मुलांचे शिक्षण करतो. शेतीची कामे ही मुख्यतः पावसावर अवलंबून असतात. पाऊस वेळेत आला तर कामे चालू होतात परंतु पाऊस कमी झाला किंवा प्रमाणापेक्षा जास्त झाला तर हाच पाऊस आम्हाला शेतीसाठी घातक ठरतो. लावणी केल्यानंतर जर अवेळी पाऊस आला तर माझ्या आणि माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे खूप नुकसान होते. म्हणजेच प्रत्येकवेळी ओला दुष्काळ किंवा सुखा दुष्काळ दोन्ही ही माझ्यासाठी घातकच आहेत. त्यामुळे या मधील कोणताच दुष्काळ संकट बनून येऊ नये हीच भीती असते.
मी शेतीची सुरुवात बी पेरणी पासून करतो. बी पेरणी पासून ते लावणी कापणी असे अनेक कामे शेतीमध्ये असतात. हे काम खूप कष्टाचे असते पण आम्ही ते खूप आनंदाने करतो. माझ्या या कामामध्ये माझे कुटूंबीयही जसे जमेल तशी माझी मदत करतात याचा मला खूप अभिमान आहे. या कामामध्ये दिवसरात्र खूप मेहनत घ्यावी लागते पण उलट त्याचा जो परतावा मिळतो तो माझ्या उदरनिर्वाह्यासाठी खूप तुटपुंजा ठरतो.