India Languages, asked by gagankaur835, 1 year ago

Marathi essay writing topics

Answers

Answered by halamadrid
0

■■निबंध लेखनाचा एक उदाहरण:■■

◆'ओणम', या विषयावर निबंध◆

ओणम हा केरळमधील एक लोकप्रिय सण आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला हा सण सुरु होतो. तो दहा दिवस चालतो. आपण नवरात्र साजरी करतो. त्याच वेळी केरळात ओणम साजरा करतात.

ओणमला केरळमधील लोक आपली घरे सजवतात. घरी वामनमूर्ती आणतात. तिची पूजा करतात. या दिवशी विष्णूने अवतार घेतला, असे माणतात.

अश्विन महिन्यात बळीराजा पृथ्वीवर येतो. लोकांना भेटतो. तो लोकांचे कल्याण करणारा राजा होता, अशी केरळमधील लोकांची श्रद्धा आहे. बळीराजाच्या स्वागतासाठी हा सण साजरा करतात.

ओणमला केरळमधील लोक मनोरंजनाचे कायक्रम करतात. खेळ करतात. स्पर्धा आयोजित करतात. त्यावेळी होणाऱ्या होड्यांच्या शर्यती खूप लोकप्रिय आहेत. या सणाच्या वेळी बाहेरगावी गेलेले लोक घरी येतात. लग्न झालेल्या मुली माहेरी येतात. सगळे लोक खूप आनंदात असतात.

ओणम हा सण उत्साहाने साजरा केला जातो.

Similar questions