Marathi
give me answer
Answers
Answer:
मित्रहो आजच्या काळात मोबाइल एक अत्यंत उपयुक्त साधन बनले आहे. आजच्या या लेखात आपण एक मोबाइल ची आत्मकथा पाहणार आहोत. या लेखाद्वारे मोबाइल चे मनोगत मांडले आहे.
माझा जन्म जवळपास 45 वर्षांआधी झाला होता. आणि आज मी तुमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलो आहे. तुम्ही माझा उपयोग दिवसभरातून अनेक वेळा करीत असतात. काही लोकांना तर माझ्याशिवाय चैनच पडत नाही. मी मोबाईल बोलतोय... होय, तुमच्या हातात असणारा मोबाईल फोन. आणि आज मी तुम्हाला माझी आत्मकथा सांगणार आहे. मी खूप लांब प्रवास करून आजच्या स्थितीपर्यंत आलो आहे. मी वर्तमान युगाला आधुनिक सुविधांनी सुसज्ज केले आहे. आज माझ्या शिवाय दैनंदिन कार्याची कल्पना देखील करता येत नाही.
सॅमसंग, नोकिया, एम आय, मायक्रोमॅक्स, इंटेक्स अश्या अनेक मोबाईल कंपन्यांनी आपले मोबाईल बाजारात आणले आहे. परंतु मला ज्या कंपनीत बनवण्यात आले त्या कंपनीचे नाव समसंग आहे. सॅमसंग कंपनीत तयार झालेले मी एक प्रसिद्ध मोबाईल मॉडेल होतो. त्यावेळी माझी किंमत 20 हजारांच्या आसपास होती. सॅमसंग च्या इंजिनीअर्सने मला आपल्या कंपनीत बनवले होते. माझ्यासोबतच माझ्या माझ्यासारखेच अनेक बंधू बनवण्यात आले. नंतरच्या काळात आम्हा सर्वांना बाजारात विक्रीसाठी आणण्यात आले.
शहरातील एका प्रसिद्ध मोबाईल दुकानात मला सजवून ठेवण्यात आले. या दुकानात दिवसभरातून अनेक ग्राहक येत असत. मी वाट पाहत होतो की लवकरच कोणीतरी येईल व मला विकत घेईल. परंतु 15 ते 20 दिवस झाले, माझ्यासोबतचे इतर मित्र निघू लागले. पण माझ्या भूर्या रंगामुळे मला कोणीही घेत नव्हते. शेवटी एक महिना झाला. आता माझ्या सोबत तयार झालेले माझे सर्व मित्र मोबाईल आपापल्या नवीन मालकासोबत निघून गेले होते. मी मात्र दररोज कोणीतरी मला नेईल या आशेने टक लाऊन पाहत बसायचो. एके दिवशी दुपारीच वेळी एक व्यक्ती दुकानात आला. त्याने माझ्या बद्दल विचारानी केली. दुकानदाराने मला उचलून त्याच्या पुढे ठेवले परंतु त्यालाही माझा रंग आवडला नाही. त्याने गुलाबी रंगाची मागणी केली. परंतु जेव्हा त्याच्या लक्षात आले की दुकानात या मॉडेल मध्ये मी एकटाच शिल्लक आहे तेव्हा त्याने मला नाईलाजाने विकत घेतले. माझा हा नवीन मालक स्वभावाने दयाळू होता. त्याने मला चांगल्या पद्धतीने ठेवले. मी सुद्धा त्याला योग्य सुविधा देण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले. कॅमेरा, गेम्स, व्हिडिओ, गाणे, इंटरनेट इत्यादी सर्व सुविधा तो आनंदाने वापरात होता.
माझा सर्वात जास्त प्रमाणात वापर मालकाचा मुलगा करीत असे. त्याचे वडील घरी आले की तो त्यांच्याकडून मोबाईल ची मागणी करीत असे. त्याला व्हिडिओ गेम्स खेळणे खूप आवडायचे. एके दिवशी गेम खेळात असताना त्याने मला पाण्यात पाडले. माझ्या आत भरपूर पाणी शिरले. माझ्या अवयवांनी आपले कार्य थांबवले. या घटनेनंतर मालक खूप चिंतित झाला त्याने मला लगेजच मोबाईल दुरुस्ती च्या दुकानावर नेले. दोन दिवसांनी माझ्यात पुन्हा जीव आला. मालकाने मला पुन्हा आपल्या सोबत नेले. परंतु आता त्याने मला त्याच्या मुलापासून दूरच ठेवले.मला दुकानातून खरेदी होऊन आज जवळपास 4 वर्षे झाली आहेत. मी आता जुना झालो आहे. माझी गती आधीपेक्षा बरीच मंदावली आहे. मालक मला अजूनही वापरात आहे. परंतु काही दिवसांआधी त्याच्या मित्राने त्याला वाढदिवशी नवीन मोबाईल गिफ्ट दिला. या घटनेनंतर त्याने मला कपाटीत ठेवून दिले. आता जवळपास एक आठवडा झाला आहे. माझी चार्जिंग संपण्यात आली आहे. मी वाट पाहत आहे की कोणीतरी येईल आणि मला स्पर्श करून जिवंत असण्याची जाणीव करून देईल.
तर मित्रहो हा होता मी मोबाइल बोलतोय / मोबाइल ची आत्मकथा / मोबाइल चे मनोगत या विषयांवरील मराठी निबंध आशा करतो की तुम्हाला निबंध आवडला असेल धन्यवाद..