Marathi जंगल भ्रमंती यावर तुमचे अनुभव कथन करा
Answers
Answer:
refer the following attachment hope it helps you please mark me as brainlist
शाळेला सुट्ट्या लागल्या आणि आम्ही सर्व मित्रांनी आमच्या शहराजवळील आज जंगलात भ्रमंती करण्याचे ठरवले. आम्ही चारही मित्र सकाळीच रिक्षाने तुंगारेश्वराच्या जंगलाकडे निघालो. तुंगारेश्वर चे जंगल हा बोरिवली राष्ट्रीय अभयारण्याचाच भाग आहे. जंगलाच्या बाहेरच रिक्षावाल्याने आम्हाला सोडले आणि म्हणाला यापुढे रिक्षा जात नाही. खऱ्या अर्थाने आमचा जंगल भ्रमंती चा प्रवास तेथून सुरू झाला.
आम्ही चारही मित्र पायी पायीच तुंगारेश्वर मंदिराकडे निघालो. जंगलात जात असताना छानसे ओढे-नाले वाहत होते. पाण्यातून चालत चालत एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत पशु पक्षांचा आवाज ऐकत आम्ही जंगलातून जात होतो. चालत असताना अचानक आमच्या समोर माकडांची टोळी दिसली अतिशय शांतपणे जंगलातील फळांचा आनंद घेत होते. आम्ही तसेच पुढे जाऊ लागलो. पुढे चालता चालता अचानक भला मोठा साप आम्हाला दिसला परंतु आम्ही सावध असल्यामुळे सुरक्षित होतो. पहिल्यांदा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कीटक पक्षी आणि प्राणी आम्हाला पाहायला मिळत होते.
अगदी रानमेवा चा आनंद घेत आम्ही तुंगारेश्वर मंदिराकडे जात होतो. झाडाला लागलेले ते सुंदर फळे खात असताना खूपच मज्जा येत होती. रस्त्याच्या दुतर्फा सुंदर असे फुलांचे झाड पसरलेली होती. आम्ही मंदिरात पोहोचलो तुंगारेश्वर ईश्वराचे दर्शन घेऊन पुन्हा जंगलाच्या आत भ्रमंती करायला सुरुवात केली. आणि मग आम्ही त्या प्रसिद्ध अशा धबधब्याच्या जवळ आलो. खरतर त्या ठिकाणी कुणीही नव्हते परंतु आम्हाला वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज येत होते आम्ही घाबरलो पण हिम्मत करून त्या धबधब्या जवळ गेलो आणि पाहण्याचा आनंद घेतला.
शेवटी संध्याकाळी आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आणि तुंगारेश्वर यांच्या गेटजवळ आल्यानंतर पुन्हा रिक्षा पकडून घरी आलो.
ही जंगल भ्रमंती आमच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय अनुभव आम्हाला देऊन गेली.